Gujarat मध्ये गोमांस तस्करांकडून गोरक्षकावर हल्ला; हुसेन, वसीमसह ५ जणांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या

41
Gujarat मध्ये गोमांस तस्करांकडून गोरक्षकावर हल्ला; हुसेन, वसीमसह ५ जणांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या
Gujarat मध्ये गोमांस तस्करांकडून गोरक्षकावर हल्ला; हुसेन, वसीमसह ५ जणांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या

गुजरातमधील (Gujarat) अहमदाबादमध्ये (Ahmedabad) एका गोरक्षकावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. गोरक्षकाने काही दिवसांपूर्वी गोमांस तस्करी करणाऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यामुळे त्यांच्यावर हल्ला करण्यात आल्याची शक्यता आहे. पीडित गोरक्षकाने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, गोमांस तस्करांकडून गोमांस जप्त केल्यामुळे हा हल्ला करण्यात आला. या हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे, जे आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. गोरक्षकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी या प्रकरणात मोहम्मद हुसेनसह (Mohammad Hussain) पाच जणांना अटक केली आहे आणि पुढील कारवाई सुरू केली आहे. (Gujarat)

( हेही वाचा : उपमुख्यमंत्री Ajit Pawar यांची स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी रणनीती; कार्यकर्त्यांना दिले ‘हे’ निर्देश

मिळालेल्या माहितीनुसार, करंज पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या लाल दरवाजा परिसरात गोरक्षकांवर हा हल्ला झाला. गोरक्षक मनोज बारिया यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पीडित गोरक्षकाने दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी सकाळी ८ वाजता तो एका मित्रासोबत रूपाली सिनेमाजवळ उभा होता. त्याचवेळी मास्क घातलेल्या चार ते पाच जणांनी त्याच्यावर धारदार शस्त्रे आणि काठ्यांनी हल्ला केला. (Gujarat)

दरम्यान, पीडित गोरक्षकाने हल्लेखोरामधील एकाच्या आवाजावरून त्याला ओळखले. हल्लेखोर मोहम्मद हुसेन उर्फ ​​लाईट उस्मान गांची होता. सुमारे तीन महिन्यांपूर्वी मनोज बारिया यांनी गांधीनगरमध्ये हुसेन आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरुद्ध ७०० किलो गोमांसाची तस्करी करत असल्यासंदर्भात तक्रार दाखल केली होती. या घटनेचा बदला घेण्यासाठी हुसेन आणि त्याच्या साथीदारांनी गोरक्षक मनोज बारियावर हल्ला केल्याचा आरोप आहे. (Gujarat)

या हल्ल्यात मोहम्मद वसीम कुरेशी (Mohammad Wasim Qureshi), मुबीन खान पठाण आणि इतर दोघे सामील होते. या हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. व्हिडिओमध्ये असे दिसून येते की, आरोपींनी गोरक्षकांचा चेहरा कापडाने झाकून मारहाण केली. ही बाब उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. (Gujarat)

अटक केल्यानंतर, पोलिसांनी हल्लेखोरांना गुन्ह्याच्या ठिकाणी नेले आणि हल्ल्याचे संपूर्ण घटनेचे recreat करायला सांगितले. करंज पोलीस ठाण्याने वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, तक्रार मिळताच पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली. सीसीटीव्ही फुटेज आणि तक्रारदाराने दिलेल्या तपशीलांच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा शोध घेतला आणि त्यांना अटक केली. या सर्वांवर भारतीय न्याय संहितेच्या कलम १८९(२), १९१(२), १९१(३), १९०, ११५(२), ११८(१) आणि गुजरात पोलिस कायद्याच्या कलम १३५(१) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Gujarat)

याप्रकरणी अधिकाऱ्याने सांगितले की, “घटनेच्या वेळी रात्री अटक केलेल्या आरोपींची चौकशी केली असता उर्वरित तीन आरोपींची ओळख पटली आणि उर्वरित तीन आरोपींना पहाटे अटक करण्यात आली. अटकेनंतर पाचही आरोपींवर नियमानुसार कारवाई करण्यात आली आणि त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. तिथून त्याला रिमांडवर पाठवण्यात आले. रिमांड मिळाल्यानंतर, आम्ही आरोपीला गुन्ह्याच्या ठिकाणी नेले आणि घटनेचे दृश्य recreat करायला लावले. (Gujarat)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.