CPI Inflation : ऑगस्टमध्ये किरकोळ महागाई दर ३.६५ टक्क्यांवर; भाज्या महागल्या, डाळी स्वस्त

रिझर्व्ह बँकेनं या वर्षासाठी महागाई दर ४.५ टक्के राहील असा अंदाज व्यक्त केला आहे.

108
CPI Inflation : ऑगस्टमध्ये किरकोळ महागाई दर ३.६५ टक्क्यांवर; भाज्या महागल्या, डाळी स्वस्त
CPI Inflation : ऑगस्टमध्ये किरकोळ महागाई दर ३.६५ टक्क्यांवर; भाज्या महागल्या, डाळी स्वस्त
  • ऋजुता लुकतुके

जुलै महिन्याच्या तुलनेत देशात भाज्या महागल्या तर डाळी स्वस्त झाल्या. त्यामुळे ऑगस्ट महिन्यातील देशाचा महागाई दर किरकोळ वाढला असून ३.५४ टक्क्यांच्या तुलनेत आता ३.६५ टक्क्यांवर पोहोचला आहे.

त्याचबरोबर अन्नधान्य चलनवाढीचा दर ५.४२ टक्क्यांवरून ५.६६ टक्क्यांवर पोहोचला आहे. शहरी चलनवाढ देखील महिन्या-दर-महिना आधारावर २.९८% वरून ३.१४% पर्यंत वाढली आहे. ग्रामीण भागातील महागाई ४.१०% वरून ४.१६% वर पोहोचली आहे. (CPI Inflation)

महागाईच्या बास्केटमध्ये खाद्यपदार्थांचा वाटा सुमारे ५०% आहे. त्याचा महागाई दर महिन्याच्या आधारावर ५.४२ % वरून ५.६६ % पर्यंत वाढला आहे. तर एक वर्षापूर्वी ऑगस्ट २०२३ मध्ये अन्नधान्य महागाई ९.९४ % होती. म्हणजेच वार्षिक आधारावर त्यातही घट झाली आहे.

(हेही वाचा – Cristiano Ronaldo : ख्रिस्तियानो रोनाल्डोचे सोशल मीडियावर तब्बल १ अब्ज फॉलोअर )

नुकत्याच झालेल्या चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीत, रिझर्व्ह बँकेनं या आर्थिक वर्षासाठी आपला महागाईचा अंदाज ४.५ % वर अपरिवर्तित ठेवला होता.

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणाले होते – महागाई कमी होत आहे, परंतु प्रगती मंद आणि असमान आहे. भारताची चलनवाढ आणि विकासाची वाटचाल संतुलित पद्धतीने पुढे जात आहे, परंतु महागाई लक्ष्यावर राहील याची खात्री करण्यासाठी जागरुक राहणे महत्त्वाचे आहे. (CPI Inflation)

महागाईचा थेट संबंध क्रयशक्तीशी असतो. उदाहरणार्थ, जर महागाई दर ६ % असेल, तर कमावलेले १०० रुपयांचं मूल्य फक्त ९४ रुपये असेल. त्यामुळे महागाई लक्षात घेऊनच गुंतवणूक करावी. अन्यथा तुमच्या पैशाचे मूल्य कमी होईल. (CPI Inflation)

कच्च्या तेल, वस्तूंच्या किमती, उत्पादित खर्चाव्यतिरिक्त, इतर अनेक गोष्टी आहेत ज्या किरकोळ महागाई दर ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. सुमारे 300 वस्तू आहेत ज्यांच्या किमतीच्या आधारे किरकोळ महागाई दर ठरवला जातो.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.