पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) वैतरणा स्थानकाजवळ (Vaitarna railway station) रेल्वे रुळाला तडा गेल्याचा प्रकार सकाळीच समोर आला आहे. रेल्वे रुळाला तडा गेल्याचे रेल्वे प्रशासनाच्या वेळीच लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला आहे. (Western Railway)
(हेही वाचा – गव्हाचे पीठ, बेसन Halal, गैर-हलाल कसे असू शकते ?; सर्वोच्च न्यायालयात प्रश्न उपस्थित)
रेल्वे रुळाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या काही गाड्या पालघर स्थानकावर (Palghar Station) थांबवण्यात आल्या आहेत. त्यामुळे मुंबईकडे येणाऱ्या लांब पल्ल्याच्या लोकल गाड्यांच्या वेळापत्रकारावरही परिणाम होण्याची शक्यता आहे.
वैतरणा स्थानकाजवळ मुंबईकडे येणाऱ्या मार्गावरील रेल्वे रुळाला तडा गेल्याची बाब आज सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने तात्काळ या मार्गावरील गाड्या पालघर स्थानकावरच रोखल्या. वेळीच खबरदारी घेण्यात आल्याने पुढील अनर्थ टळला. सध्या रेल्वे रुळ दुरुस्तीचे काम सुरू आहे. तसंच गुजरातकडे जाणारी रेल्वे वाहतूक (crack in railway track) सुरू असून मुंबईकडे येणाऱ्या लांब पल्ल्याचा गाड्या उशिराने धावत आहेत. (Western Railway)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community