-
प्रतिनिधी
दूध भेसळीला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र शासनाने अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ (Narhari Zirwal) यांच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक कारवाई केली आहे. मुंबईत प्रवेश करणाऱ्या ९८ दूध टॅंकरची मध्यरात्री झडती घेण्यात आली, ज्यात एकूण ९६ लाख ६८ हजार ३२ रुपयांच्या १,८३,३९७ लिटर दुधाची तपासणी करण्यात आली. तपासणी दरम्यान मानखुर्द येथे कमी दर्जाचे दूध आढळून आले आणि संबंधित वाहन परत पाठवण्यात आले, असे अन्न व औषध प्रशासन विभागाने स्पष्ट केले.
दूध भेसळीवर मंत्री झिरवळ यांचा आक्रमक पवित्रा
गेल्या काही वर्षांपासून दूध भेसळ हा राज्यातील गंभीर प्रश्न ठरला होता. मात्र नरहरी झिरवळ (Narhari Zirwal) यांनी अन्न व औषध प्रशासन मंत्रालयाची जबाबदारी स्वीकारताच या विभागाला वेगळी प्रतिष्ठा मिळाली आहे. १२ व १३ फेब्रुवारीच्या मध्यरात्री झालेल्या धडक तपासणीत त्यांनी स्वतः उपस्थित राहून “दूध भेसळ आता भूतकाळात जमा झाली आहे” हे स्पष्ट केले. “महाराष्ट्र बदलला आहे, भेसळखोरांवर कठोर कारवाई होणार,” असा इशाराही त्यांनी दिला.
(हेही वाचा – PM Awas Yojana Urban 2.0 : शहरी गरीबांसाठी प्रधानमंत्री आवास योजना शहरी 2.0 ची अंमलबजावणी सुरू)
मध्यरात्री चार ठिकाणी मोठी तपासणी
मुंबईत प्रवेश करणाऱ्या दुधाच्या टॅंकरची झडती घेण्यासाठी चार मुख्य नाक्यांवर तपासणी मोहीम राबवण्यात आली.
- मुलुंड चेक नाका (पूर्व) : १३ टॅंकर – २,८३३ लिटर दूध (मूल्य ₹१,४१,०६०)
- मानखुर्द (वाशी) चेक नाका : ४१ टॅंकर – ९८,२१५ लिटर दूध (मूल्य ₹३१,२००)
- दहिसर चेक नाका : १९ टॅंकर – ८,९७७ लिटर दूध (मूल्य ₹५३,८६,३८०)
- ऐरोली चेक नाका : २५ टॅंकर – ७३,३७२ लिटर दूध (मूल्य ₹४०,४८,१९२)
तपासणी दरम्यान गाईचे दूध, पाश्चराइज्ड टोन्ड दूध, डबल टोन्ड दूध यासह विविध प्रकारच्या दुधाची शास्त्रीय चाचणी करण्यात आली.
मंत्री झिरवळ यांनी स्वतः घेतला आढावा
मध्यरात्रीच्या या कारवाईत मंत्री नरहरी झिरवळ (Narhari Zirwal) प्रत्यक्ष हजर राहिले. त्यांच्या उपस्थितीमुळे अधिकाऱ्यांना ऊर्जा मिळाली आणि भेसळखोरांपर्यंत कडक संदेश पोहोचला. या मोहिमेने नागरिकांना सरकार त्यांच्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी गंभीर असल्याचा विश्वास दिला.
(हेही वाचा – महिला व बालविकास विभागात १८ हजार ८८२ पदांची भरती; मंत्री Aditi Tatkare यांची घोषणा)
गेल्या काही महिन्यांतील निर्णायक कारवाई
- मंत्री झिरवळ यांनी याआधीही अचानक छापे टाकून भेसळखोरांना धडा शिकवला आहे.
- दूध भेसळीला आळा घालण्यासाठी सर्व जिल्ह्यांत कठोर तपासणी मोहिमा सुरू करण्यात आल्या आहेत.
- काही महिन्यांपूर्वी साम टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत “दूध भेसळ करणाऱ्यांना कोणतीही सवलत दिली जाणार नाही” असा इशारा दिला होता, आणि त्यांनी तो कृतीतून दाखवून दिला.
महाराष्ट्रात बदलाची सुरुवात!
लहान मुलांचे आरोग्य आणि नागरिकांची सुरक्षा लक्षात घेऊन मंत्री झिरवळ यांनी या मोहिमेत पुढाकार घेतला. दिवस-रात्र जनतेच्या सुरक्षेसाठी झटणारे मंत्री मिळाल्यामुळे महाराष्ट्रातील जनता आता अधिक निश्चिंत झाली आहे. दूध भेसळीविरोधातील ही कठोर भूमिका कायम राहील आणि भविष्यातही असेच ऑपरेशन सुरू राहतील, असेही मंत्री नरहरी झिरवळ (Narhari Zirwal) यांनी स्पष्ट केले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community