लहान मुलांना दुचाकीवर बसवताय? त्याआधी वाचा हे नवे नियम!

130

लॉकडाऊननंतर शाळा आता पुन्हा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे अनेक पालक आपल्या मुलांना स्वत: दुचाकी अथवा गाडीने शाळेत सोडत आहेत. अनेक पालक आपल्या लहान मुलांना दुचाकीवर बसवताना हेल्मेटचा वापर करत नाहीत.

म्हणूनच सुरक्षेच्या दृष्टीकोनातून केंद्र सरकारने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने जारी केलेल्या नव्या नियमांनुसार, आता ४ वर्ष वयोगटापर्यंतच्या मुलांसोबत दुचाकीवरून प्रवास करताना नवीन नियमांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे.

( हेही वाचा : ठाणे शहरातील वाहतुकीत मोठा बदल! ‘या’ मार्गांवर महिनाभर प्रवेश बंदी )

नवे नियम जारी 

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने १५ फेब्रुवारी २०२२ रोजी नवी अधिसूचना जारी केली आहे. त्यात चार वर्षांखालील मुलांना दुचाकीवरुन नेण्यासाठी केलेल्या सुरक्षा उपाययोजनांशी संबंधित नियम निर्धारित केले गेले आहेत. मोटार वाहन कायद्याच्या कलम १२९ अंतर्गत हे नियम अधिसूचित करण्यात आले आहेत. 9 महिने ते 4 वर्षे वयोगटातील मुलांना दुचाकीवरून प्रवास करताना हेल्मेट घालणे आवश्यक असेल. तसेच दुचाकीचा वेग 40 किमी प्रतितास पर्यंत मर्यादित असावा, असे या अधिसूचनेत सांगण्यात आले आहे. या नवीन वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास 1 हजार रुपये दंड होऊ शकतो आणि तीन महिन्यांसाठी ड्रायव्हिंग लायसन्स निलंबित केले जाऊ शकते.

सेफ्टी हार्नेस

लहान मुलांसोबत प्रवास करताना सेफ्टी हार्नेसचा वापर करावा. हा सेफ्टी हार्नेस टिकाऊ, मऊ, हलका व जलरोधक असावा. तसेच या सेफ्टी हार्नेसची वजन/भार क्षमता 30 किलोपर्यंत असावी. बीआयएसने (BIS) लहान मुलांच्या हेल्मेटसाठी स्वतंत्र मानक जारी केलेले नाही. तोपर्यंत लहान मुलांसाठी सायकल हेल्मेटचा देखील वापर केला जाऊ शकतो.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.