सार्वजनिक उत्सव मंडळांमधील उत्साह मावळतोय का?

सार्वजनिक उत्सव मंडळांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन दीड दिवसांमध्ये दुप्पटीने वाढल्याचे पहायला मिळत आहे.

कोविडच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांवर उत्सव साजरा करण्यासाठी आलेले निर्बंध आणि देणगीदारांनी घेतलेला आखडता हात यामुळे उत्सव मंडळांनी पाच किंवा सात दिवसांसह अनंत चतुर्दशीपर्यंत बाप्पांची सेवा करण्याऐवजी, आता दीड दिवसांमध्ये निरोप देण्यात धन्यता मानली आहे. कोविडमुळे मागील वर्षी सार्वजनिक उत्सव मंडळाच्या गणेशमूर्तींचे विसर्जन हे दीड दिवसांमध्ये झाले असले, तरी यावर्षी हे प्रमाण कमी असणे आवश्यक होते. परंतु यावर्षी तर सार्वजनिक उत्सव मंडळांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन दीड दिवसांमध्ये दुप्पटीने वाढल्याचे पहायला मिळत आहे.

१९० अधिक मूर्तींचे विसर्जन

मागील वर्षी केवळ २०१ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन पार पडले होते, तर यावेळी मात्र उत्सव मंडळांच्या ३९५ गणेशमूर्तींचे विसर्जन पार पडले. त्यामुळे या दोन्ही वर्षांतील विसर्जन आकडेवारीवर नजर टाकल्यास यंदा उत्सव मंडळाच्या गणेश मंडळांनी केवळ दीड दिवसांमध्येच निरोप देण्यावर धन्यता मांडल्याचे पहायला मिळते. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत यंदा लगबग दुप्पट म्हणजे सुमारे १९० अधिक मूर्तींचे विसर्जन पार पडले आहे.

(हेही वाचाः यंदा दीड दिवसांमध्ये २० हजार बाप्पांना निरोप नाही)

सार्वजनिक उत्सवांचे महत्व कमी?

सार्वजनिक उत्सव मंडळांवर कोविड प्रतिबंधक नियम लागू केल्यामुळे दरवर्षी उत्सवाच्या नावावर केला जाणारा धांगडधिंगा करता येणार नसल्याने, तसेच देणगीदारांनीही आखडता हात घेतल्यामुळे उत्सव मंडळांचे खिसे रिते झाले आहेत. त्यामुळे आता प्रथेप्रमाणे बाप्पांना विराजमान करुन दीड दिवसांमध्ये विसर्जन करुन उत्सव साजरा केल्याचे समाधान आता मंडळे मानून घेत आहेत. कोविडच्या आजाराचा कहर असताना सार्वजनिक उत्सव मंडळांनी बाप्पांची सेवा अनंत दिवस केली. परंतु कोविडची दुसरी लाट ओसरुन गेल्यानंतर बऱ्यापैकी वातावरण असतानाही उत्सव मंडळांनी ३९५ गणेशमूर्तींचे विसर्जन केल्यामुळे सार्वजनिक उत्सवांचे महत्व आता कमी होणार की काय, असा प्रश्न निर्माण होत आहे.

(हेही वाचाः कृत्रिम तलावांकडे वळू लागले भाविक! दीड दिवसांच्या इतक्या मूर्तींचे विसर्जन)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here