गणेशोत्सवात चाकरमान्यांची गावाला जाण्यासाठी धावपळ सुरु असते. अशातच संभाव्य वाहतूक कोडींचा विचार करता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत. मुंबई- पुणे महामार्गावर होत असलेल्या वाहतूक कोंडीची मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेत, गणेशोत्सवात जाणा-यांना एक विशेष स्वतंत्र मार्गिका ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत.
मुख्यमंत्र्यांनी खालापूर टोल नाक्यावरील एकनाथ शिंदे रविवारी खालापूर टोलनाक्याला भेट दिली. यानंतर त्यांनी खालापूर टोल नाका परिसरात असेलल्या अधिका-यांसोबत आणि पोलिसांसोबत चर्चा केली. या चर्चेदरम्यान, त्यांनी गणेशोत्सवासाठी जाणा-या वाहनांना टोलनाक्यावर स्वतंत्र मार्गिका करण्याबाबत सांगितले.
मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मुंबई- गोवा महामार्गाची झालेली चाळण पाहता, अनेक जण कोकणात जाण्यासाठीही मुंबई- पुणे द्रुतगती मार्गालाच पसंती देत आहेत. त्यामुळे या मार्गावर वाहतूक कोंडी होण्याची दाट शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी आधीच खबरदारी पावले उचलण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.
( हेही वाचा: ‘या गबरू जवानाचे नाव गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये यावे’, भाजपचा पवारांना टोला )
कायमस्वरुपी तोडगा काढावा
शनिवारी मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. त्यानंतर या मार्गावरील दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अमृतांजन पुलाजवळ सुट्टीच्या दिवशी होणारी वाहतूक कोंडी पाहता, त्यावर कायमस्वरुपी तोडगा काढावा, अशीही मागणी वाहनचालकांकडून केली जात आहे. दरम्यान, शनिवारी एका दिवसासाठी मुंबई- पुणे एक्सप्रेस हायवेवर जाणा-या वाहनांना टोलमाफीदेखील देण्यात आली होती.
Join Our WhatsApp Community