आता Credit Card चे बिल तुमच्या सोयीनुसार भरा, RBI चा मोठा निर्णय

114

RBI कडून देशभरातील क्रेडिट कार्डधारकांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. क्रेडिट कार्डधारक आता आपल्या सोयीनुसार बिलिंग सायकल निवडू शकतील. हा नवीन नियम 1 जुलै 2022 पासून लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे आता क्रेडिट कार्डधारक आपल्याला हव्या असलेल्या तारखेनुसार क्रेडिट कार्डचे बिल भरू शकणार आहेत.

आतापर्यंत क्रेडिट कार्डचे बिल भरण्याची तारीख ही बँकेकडून निश्चित करण्यात येत होती. पण आता 1 जुलैपासून हा नवा नियम लागू करण्यात येणार आहे. पण हे बिलिंग सायकल क्रेडिट कार्डधारकांना एकदाच बदलता येणार आहे.

(हेही वाचा: EPFO: या चुका झाल्या तर तुमचे PF अकाऊंट बंद होऊ शकते )

RBI करणार कारवाई

यापूर्वी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI)ने बँकांना क्रेडिट कार्ड जारी करण्यास किंवा कार्डांची मर्यादा वाढविण्यास किंवा ग्राहकांच्या मंजुरीशिवाय इतर सुविधा सुरू करण्यास मनाई केली आहे. याचे पालन न केल्यास संबंधित कंपन्यांना बिलाच्या दुप्पट रक्कम दंड म्हणून भरावी लागणार आहे. ज्या व्यक्तीच्या नावाने कार्ड जारी केले आहे ती व्यक्ती आरबीआय लोकपालाकडे आपली तक्रार दाखल करू शकते. त्यानुसार बँकांना दंडाची रक्कम ठोठावण्यात येईल.

वसुलीवर प्रतिबंध

तसेच कार्ड जारी करणार्‍या संस्था ग्रहकांकडून बिलाची रक्कम वसूल करण्यासाठी थर्ड पार्टीच्या माध्यमातून त्रास देत असतात. अशा कारवायांवर देखील आता आरबीआयकडून प्रतिबंध घालण्यात आला आहे. 1 जुलै 2022 पासून हे नवीन नियम लागू होणार आहेत.

(हेही वाचा: दुचाकीवर दोघांनाही हेल्मेट सक्तीच्या निर्णयानंतर, सचिनच्या ट्वीटची होतेय चर्चा)

नवीन नियम

नव्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, 100 कोटी रुपयांची निव्वळ संपत्ती असलेल्या व्यावसायिक बँका स्वतंत्रपणे किंवा कार्ड जारी करणार्‍या बँका/नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्या (NBFCs) यांच्याशी टाय-अप करून क्रेडिट कार्ड व्यवसाय करू शकतात. प्रादेशिक ग्रामीण बँकांना त्यांच्या प्रायोजकांसह किंवा इतर बँकांच्या भागीदारीत क्रेडिट कार्ड जारी करण्याची परवानगी आहे. मात्र, NBFC आरबीआयच्या परवानगीशिवाय स्वतंत्रपणे क्रेडिट कार्ड व्यवसाय सुरू करणार नाहीत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.