- ऋजुता लुकतुके
रिझर्व्ह बँकेनं नुकतेच क्रेडिट कार्ड ग्राहकांसाठी काही नवीन बदल केले आहेत. यानुसार, क्रेडिट कार्डाचं नेटवर्क कुठलं असावं हे ठरवण्याचा अधिकार आता ग्राहकांना मिळणार आहे. त्यामुळे ग्राहकांकडे तो पर्याय असेल. सध्या भारतात मास्टरकार्ड, व्हिसा, ॲमेक्स आणि रुपे ही नेटवर्क उपलब्ध आहेत. यातील व्हिसा आणि मास्टरकार्ड ही नेटवर्क जगभरात प्रामुख्याने वापरली जातात. (Credit Card)
(हेही वाचा- IPL 2024 : विराट कोहली आयपीएल खेळणार का?)
सध्या बँका क्रेडिट कार्ड देताना आधीच या नेटवर्कशी करार करतात. आणि ग्राहकांना नेटवर्क निवडण्याचा पर्याय उपलब्ध नाहीए. पण, इथून पुढे बँकांकडून कार्ड घेताना नेटवर्क ग्राहक म्हणून तुम्ही निवडू शकाल. आणि सध्याचे ग्राहक जेव्हा नवीन कार्ड घेतील तेव्हा त्यांना हा नेकवर्क निवडीचा पर्याय मिळेल. (Credit Card)
रिझर्व्ह बँकेचा हा नवीन नियम ६ सप्टेंबर २०२४ पासून लागू होईल. पण, ज्या बँकांचं स्वत:चं क्रेडिट कार्ड नेटवर्क असेल त्यांना हा नियम लागू होणार नाही. जसं अमेरिकन एक्सप्रेस बँकेचं त्याच नावाने क्रेडिट कार्ड नेटवर्कही आहे. त्यांना आपल्या कार्डांसाठी हेच नेटवर्क वापरण्याची परवानगी असेल. त्यांनी ग्राहकांना निवडीचा अधिकार दिला नाही तरी चालू शकेल. (Credit Card)
(हेही वाचा- Devendra Jhajhariya Retires : पॅरालिम्पिक खेळाडू देवेंद्र झाझरिया आंतरराष्ट्रीय खेळातूंन निवृत्त)
ग्राहकांना याचा कसा फायदा होणार?
यापूर्वी क्रेडिट कार्डाचं नेटवर्क बँका ठरवत होत्या. आणि पूर्वनिर्धारित नेटवर्कसह कार्ड ग्राहकांना विकत होत्या. पण, आता ग्राहकांना नेटवर्क निवडण्याचा अधिकार असल्यामुळे ग्राहक हव्या त्या बँकेचं कार्ड हव्या त्या नेटवर्कसह घेऊ शकतील. याचा एक फायदा कार्डवर असलेल्या सुविधांसाठी होऊ शकेल. (Credit Card)
म्हणजे कार्डावर बँका जशा आपल्याला सवलती आणि सुविधा देतात तशा त्या नेटवर्क कंपन्याही देत असतात. उदाहरणार्थ, मास्टरकार्ड नेटवर्क आपल्या उच्चभ्रू ग्राहकांना गोल्फ कोर्सचं सदस्यत्व मोफत देतं. तेव्हा ज्यांना ही सुविधा हवी आहे, ते ग्राहक हवी ती बँक निवडण्याबरोबरच हवं ते नेटवर्क निवडून त्या सुविधेचा लाभ घेऊ शकतात. (Credit Card)
(हेही वाचा- Farmer Protest : हातात तलवार घेऊन कोणी आंदोलन करत का? ही अत्यंत लाजिरवाणी बाब…उच्च न्यायालय शेतकऱ्यांवर संतापले)
खासकरून विमानतळावरील लाऊंजची उपलब्धताही नेटवर्कवरच मिळत असते. तो अधिकारही आता ग्राहकांना मिळेल. (Credit Card)
या नियम बदलांमुळे भारतीय क्रेडिट कार्ड नेटवर्क असलेल्या रुपेलाही प्रोत्साहन मिळू शकेल. रुपे हे नेटवर्क नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने विकसित केलं आहे. आता लोकांनी देशात तयार झालेल्या या नेटवर्कचा अधिकाधिक वापर करावा असा देशातील यंत्रणांचा प्रयत्न असेल. (Credit Card)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community