भारतीय संघाचा स्टार क्रिकेटपटू केदार जाधव वेगळ्या कारणासाठी चर्चेत आला आहे. केदार जाधवने ३१ मार्च रोजी भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीवेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) हेदेखील उपस्थित होते. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांच्याशीही केदार जाधवची जवळीक आहे. त्यामुळे केदार जाधव खरेच राजकारणात प्रवेश करणार आहे का, हे येत्या काळात समोर येईल. (Cricketer Kedar Jadhav)
(हेही वाचा – Lok Sabha Elections 2024 : मतदानाच्या काळात कोणत्याही यात्रा, सुट्टी न करता मतदानाचा हक्क बजावा; डॉ नीलम गोऱ्हे यांचे आवाहन)
त्याने देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतल्याने तो भाजपमध्ये प्रवेश करणार का, याबाबत तर्क-वितर्क लढवले जाऊ लागले आहेत. हा आक्रमक फटकेबाजीसाठी आणि अचूक गोलंदाजीसाठी ओळखला जातो. मूळचा केदार जाधव याने त्याच्या खासगी कामासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे, अशी माहिती आहे. मागील काही दिवसांतील केदार जाधव याची ही दुसरी भेट आहे. लोकसभा निवडणुकीची (lok sabha elections 2024) धामधूम सुरू असतानाच मराठमोळ्या केदारने घेतलेल्या देवेंद्र फडणवीसांच्या भेटून सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.
केदार जाधवची क्रिकेट कारकीर्द
अष्टपैलू केदार जाधवने भारताकडून ७३ एकदिवसीय सामने खेळले असून १ हजार ३८९ धावा केल्या आहेत. एकदिवसीय सामन्यांत दोन शतके आणि सहा अर्धशतके त्याच्या नावावर आहेत. केदारने ९ आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यांत १२२ धावा केल्या आहेत. आयपीएलमध्येही केदार जाधवने आरसीबी आणि सीएसके या संघांचे प्रतिनिधित्व केले आहे. काही काळापासून तो आयपीएल सामन्यांसाठी मराठीमध्ये समालोचनही करत आहे. (Cricketer Kedar Jadhav)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community