दहावी शिकलेले बनले डॉक्टर…चक्क कोरोनाबाधितांवर केले उपचार!

दहावी, बारावी शिक्षण घेतलेल्या या डॉक्टरांनी कंपाऊंडर म्हणून काम करता करता, स्वतःचे क्लिनिक सुरू करून गोवंडी शिवाजी नगरातील गरीब आणि अशिक्षित जनतेच्या जीवाशी मागील अनेक वर्षांपासून खेळ मांडला होता.

162

गरीब जनतेच्या जीवाशी खेळणाऱ्या अशिक्षित डॉक्टरांचे पितळ मुंबई गुन्हे शाखेने उघडे पाडले आहे. एक नाही, दोन चक्क पाच अशिक्षित डॉक्टरांची गुन्हे शाखेकडून महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाच्या मदतीने तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे. कुठल्याही प्रकारची वैद्यकीय शाखेची पदवी अथवा वैद्यकीय शिक्षण न घेतलेल्या या डॉक्टरांनी गोवंडीच्या शिवाजी नगर येथे आपले दुकान थाटून कोरोनाच्या काळात लोकांच्या जीवाशी खेळ मांडला होता. या पाचही बोगस डॉक्टरांविरुद्ध गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.

जनतेच्या जीवाशी खेळ मांडला

क्षमा क्लिनिक, आलिशा क्लिनिक,आशिफा क्लिनिक, रहेमत क्लिनिक आणि मिश्रा क्लिनिक असे कारवाई करण्यात आलेल्या डॉक्टरांच्या क्लिनिकची नावे आहेत. ही क्लिनिक गोवंडी शिवाजी नगरातील बैगण वाडी परिसरात होती. ही क्लिनिक चालवणारे डॉक्टर ४३ ते ५१ वयोगटातील असून, मागील अनेक वर्षांपासून हे डॉक्टर या परिसरात बोगस क्लिनिक चालवत होते. या डॉक्टरांकडे कुठल्याही प्रकारची वैद्यकीय प्रमाणपत्र नसून, त्यांनी कुठेही वैद्यकीय शिक्षण घेतलेले नाही. दहावी, बारावी शिक्षण घेतलेल्या या डॉक्टरांनी कंपाऊंडर म्हणून काम करता करता, स्वतःचे क्लिनिक सुरू करून गोवंडी शिवाजी नगरातील गरीब आणि अशिक्षित जनतेच्या जीवाशी मागील अनेक वर्षांपासून खेळ मांडला होता.

New Project 7 6
बोगस डॉक्टरांची बोगस प्रमाणपत्रे 

(हेही वाचा : अखेर नारायण राणेंची ‘ती’ इच्छा पूर्ण झाली!)

पोलिसांची कारवाई

कोरोनाच्या काळात या बोगस डॉक्टरांनी या परिसरातील नागरिकांवर उपचार करून गरिबांची लूट केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. बोगस क्लिनिक चालवणाऱ्या या बोगस डॉक्टरांची मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा कक्ष-६ ने यादी तयार केली. मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या मदतीने यांची माहिती मिळवून बुधवारी महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या डॉ. प्रिया कोळी यांच्या मदतीने या क्लिनिकवर छापे टाकले. या कारवाईत या पाचही झोला छाप डॉक्टरांना ताब्यात घेऊन त्यांच्या क्लिनिक मधून अँटिबायोटिक औषधे, विविध इंजेक्शन आणि इतर सामुग्री जप्त करून क्लिनिक सील करण्यात आले असल्याची माहिती गुन्हे शाखेने दिली आहे. या पाचही झोला छाप डॉक्टरांविरुद्ध शिवाजी नगर पोलिस ठाण्यात फसवणूक, महाराष्ट्र वैद्यकीय प्रशिक्षण कायदा अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांना शिवाजी नगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असल्याची माहिती गुन्हे शाखेने दिली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.