पुण्यातील (Crime) ससून रुग्णालयातून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून गेलेला ड्रगमाफिया ललित पाटील (Drug mafia Lalit Patil) याला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने (Mumbai Crime Branch) तामिळनाडूतील चेन्नई येथे अटक (arrested) केली. तो २ ऑक्टोबरला रुग्णालयातून पळून गेला होता. गेल्या १५ दिवसांपासून पोलीस त्याचा शोध घेत होते.
ललिल पाटील रुग्णालयातून पळून गेल्यानंतर रुग्णालय प्रशासन आणि येरवडा कारागृह प्रशासन याबाबत अनेक आरोप-प्रत्यारोप होत होते. राजकीय आरोप-प्रत्यारोपांचाही यामध्ये समावेश झाला. यादरम्यान पुणे पोलिसांनी ललित पाटीलचा भाऊ भूषण पाटील आणि अभिषेक बलकवडे यांना उत्तर प्रदेश येथून अटक केली. त्या दोघांना २० ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
(हेही वाचा – Crime : मुस्लिम कुटुंबियांकडून नवविवाहित जोडप्याची हत्या)
या दोघांबाबत कारवाई सुरू असतानाच या प्रकरणातील मुख्य आरोपी ललित पाटीलला मुंबई पोलिसांनी तामिळनाडूतील चेन्नई येथून अटक करण्यात आली. त्यामुळे आता अनेक गोष्टींचा खुलासा होण्याची शक्यता आहे. साकीनाका पोलीस स्थानकात ललित पाटीलला आणणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
Join Our WhatsApp Community