देशात एकूण ३५ लाख ६१ हजार ३७९ गुन्हे नोंद झालेले आहेत. त्यांपैकी १०.२ टक्के गुन्हे केवळ महाराष्ट्रात नोंद झाले असून महाराष्ट्र देशातील गुन्हेगारीत दुसर्या क्रमांकावर आहे. ‘कायदा आणि सुव्यवस्था राखण्यास सरकार अपयशी ठरले आहे’, असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी १२ जुलै या दिवशी विधान परिषदेत केला. (Crime In Maharashtra)
(हेही वाचा – Bhushan Gavai : राज्यातील न्यायदानाची गती वाढणार; ऑनलाईन सुनावणी कक्ष व अभिलेख कक्षाचे उद्घाटन)
या सरकारने केलेल्या सर्व घोषणा सर्वसामान्यांच्या हितासाठी नसून केवळ कंत्राटदारांच्या हितासाठी केल्या आहेत, अशा शब्दांत दानवे यांनी २६० अनव्ये प्रस्तावावर बोलतांना सरकारने केलेल्या विविध घोषणांवर टीका केली.
ते पुढे म्हणाले की, देशात महिलांवरील अत्याचारांचे ४ लाख ४५ सहस्र गुन्हे नोंद झाले आहेत. त्यांपैकी ४५ सहस्र गुन्हे एकट्या महाराष्ट्रात नोंद आहेत. आम्ल फेकण्याच्या घटना, सायबर गुन्हे यात महिलांवरील गुन्ह्याचे प्रमाण अधिक आहेत. एकीकडे सरकारने ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ आणली; मात्र प्रत्यक्षात महिलांचे संरक्षण करण्यास सरकार अपयशी ठरले आहे, असा आरोप विरोधी पक्ष करत आहेत. (Crime In Maharashtra)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community