फायमोसिस विथ पिनलाइन टॅार्शन (Phimosis with pinline torsion) (लघवीच्या जागेवरील खाज) या आजाराची सुमारे २५ मिनिटांत शस्त्रक्रिया होईल, असे सांगून ऑपरेशन थिएटरमध्ये नेलेल्या साडेपाच वर्षांच्या चिमुकल्याचा चुकीच्या उपचारामुळे मृत्यू झाला. याप्रकरणी घाटीतील समितीने अहवाल दिल्यानंतर ६ डॉक्टरांवर पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. बालकाला भुलीनंतर ३-३ इंजेक्शन्स देण्यात आली होती. (Crime News)
मल्टिऑर्गन फेल्युअरमुळे (Multiorgan failure) मुलाचा मृत्यू झाल्याचे समितीच्या अहवालात म्हटले आहे. शस्त्रक्रियेपूर्वी, ‘मम्मी टेन्शन मत लो, सिम्पलसी बात है,’ असे सांगून तो ऑपरेशन थिएटरमध्ये गेला होता. विशेष म्हणजे, चिमुकल्याचा मृत्यू २४ एप्रिल २०२४ रोजी झाला. मात्र, त्यानंतर डॉक्टरांनी त्याला ११ दिवस व्हेंटिलेटरवर ठेवले होते. हा धक्कादायक प्रकार गारखेड्यातील वेदांत बाल रुग्णालयात घडला होता. (Crime News)
नेमकं काय घडलं ?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दैविक अविनाश अघाव (Daivik Avinash Aghav) असे या मृत बालकाचे नाव आहे. अविनाश दत्तात्रय आघाव (४१, रा. सप्तश्री वाटिका, स्वप्ननगरी, गारखेडा परिसर) यांनी यासंदर्भात तक्रार दिली होती. त्यांचा मुलगा दैविकला गुप्तांगावर खाजेचा त्रास होत होता. त्यामुळे २० एप्रिल रोजी त्याला वेदांत बाल रुग्णालयात नेले. तेथे डॉ. अर्जुन पवार यांनी त्याला तपासले. (Crime News)
‘फायमोसिस विथ पिनाइल टॉर्शन’ हा आजार असल्याचे सांगून त्यासाठी छोटेसे ऑपरेशन करावे लागते. त्याचा १६ हजार रुपये खर्च येतो, अशी माहिती दिली. २६ एप्रिल रोजी ऑपरेशन ठरले. २५ एप्रिल रोजी रात्री दैविकला रुग्णालयात दाखल केले. शस्त्रक्रियेसाठी १० हजार रुपये भरले. २६ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजता त्याला ऑपरेशनसाठी नेण्याची तयारी केली. सव्वासात वाजता डॉ. अर्जुन पवार, भूलतज्ज्ञ डॉ. शेख मोहंमद इलियास आले. २५ मिनिटांत ऑपरेशन होईल, असे त्यांनी सांगितले. मात्र, ४५ मिनिटे झाली तरी ऑपरेशन झाले नव्हते. एक तासाने डॉ. पवार ऑपरेशन थिएटरमधून बाहेर आले. डॉ. इलियास यांनी बाळाला स्पाइनलमध्ये भूल दिली होती. पण, त्याने हात हलवल्यामुळे झोपेचे इंजेक्शन दिले. बालक सध्या बेशुद्ध असल्याचे सांगितले. (Crime News)
घटना सीसीटीव्हीत कैद
दैविकला भूल दिल्यानंतर तीन इंजेक्शन्स ्देण्यात आली. याचे सीसीटीव्हीत चित्रीकरण झाले आहे. हे इंजेक्शन कशाचे होते याची समितीला माहिती नाही. ११ दिवस दैविक व्हेंटिलेटरवर होता. ६ जून २०२४ रोजी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. (Crime News)