अमरावती शहरात लावण्यात आलेल्या फ्लेक्स, बॅनर, होर्डिंगवर मुद्रक व प्रकाशकाचे नाव टाकणे अनिवार्य आहे. तसेच बॅनर लावताना बाजार व परवाना विभाग, महानगरपालिका यांची परवानगी घेणे अनिवार्य आहे. अनधिकृत फ्लेक्स, बॅनर, होर्डिंग असल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे निर्देश महापालिका आयुक्त डॉ परणीं आष्टीकर यांनी दिले आहेत.
( हेही वाचा : सरकारी नोकरी शोधताय? मग ही आहे सुवर्णसंधी )
कारवाई करण्याचे आदेश
शहरात आगामी महापालिका निवडणूक लक्षात घेता अनेकांनी सध्या शहरातील प्रत्येक प्रभागात बॅनरबाजी सुरु केली आहे. मात्र, या अनधिकृत बॅनरबाजीला आळा घालण्यासाठी धडक कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांनाकडून देण्यात आले आहेत. होर्डिंगची स्टॅबलीटी तपासण्याचे निर्देश देण्यात आले आहे. जे होर्डिंग अनधिकृत ठरत असेल ते काढण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. बाजार व परवाना विभागाच्या होर्डिंगबाबतच्या अटी जो पूर्ण करेल त्यांना होर्डिंग नाहरकत प्रमाणपत्र देण्यात यावे. बाजार व परवाना विभाग व अतिक्रमण विभाग यांनी अनधिकृत फ्लेक्स, बॅनर, होर्डिंग काढण्याची कारवाई निरंतर सुरु ठेवावी अशा स्पष्ट सूचना आयुक्तांकडून देण्यात आल्या आहेत. कोणीही अनधिकृत फ्लेक्स, बॅनर, होर्डिंग शहरात लावू नये अन्यथा फौजदारी कारवाई करण्यात येईल. असेही त्यांनी सांगितले आहे.
९५ अनधिकृत फलक हटविण्यात आले
मनपा आयुक्त यांच्या आदेशानुसार गुरूवार पासून अनधिकृत फलक हटविण्याचे मोहीम सुरु करण्यात आली असून, सदर मोहिममध्ये सुमारे ९५ अनधिकृत फलक हटविण्यात आले आहे. अनधिकृत फलक हटविण्याची कारवाई बाजार व परवाना विभागाचे कर्मचारी, अतिक्रमण विभागाचे कर्मचारी व पोलीस कर्मचारी यांनी केली.
Join Our WhatsApp Community