Nylon Manja निर्मिती, वापर व विक्री करणाऱ्यांवर होणार कारवाई

165
Nylon Manja निर्मिती, वापर व विक्री करणाऱ्यांवर होणार कारवाई
Nylon Manja निर्मिती, वापर व विक्री करणाऱ्यांवर होणार कारवाई

मकर संक्रांतीच्या अगोदर व नंतर काही दिवस पतंग उडविण्याचे प्रमाण जास्त असते. त्यासाठी नायलॉन मांजा (Nylon Manja) (दोरा) या धाग्याचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. तसेच या मांजामुळे मानवी जीवितास, पशु-पक्षी यांच्या जीवितास धोका निर्माण होऊन जखमी व मृत होण्याच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. पर्यावरण अधिनियमानुसार, नायलॉन मांजाचा वापर, विक्री व निर्मिती करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. (Nylon Manja)

हेही वाचा-Himachal Snowfall: हिमाचलमध्ये बर्फवृष्टी पाहण्यासाठी 48 तासांत 80 हजार वाहनांतून आले 3 लाख पर्यटक

सर्व घाऊक व्यापारी, किरकोळ व्यापारी, साठवणुकदार यांना नायलॉन मांजाची विक्री व साठवणुक करण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे. आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व पोलीस विभाग यांनी स्वतंत्ररित्या पथके तयार करुन आवश्यक ती कार्यवाही करावी. सदर आदेशाचे कोणतीही व्यक्ती वा संस्था यांनी उल्लंघन केल्यास पर्यांवरण (संरक्षण) अधिनियम 1986 चे कलम 15 अन्वये शिक्षेस पात्र राहिल, असे जिल्हा दंडाधिकारी यांच्या आदेशात नमूद आहे. (Nylon Manja)

खंडपीठाचा महत्त्वपूर्ण आदेश
या प्रकरणी मांजा सापडेल ते ठिकाण सील करावं. अल्पवयीन मुलांकडे नायलॉन मांजा कुठून आणला याची माहिती लपवली तर पालकांवरही गुन्हा दाखल करावा, असे आदेश औरंगाबाद खंडपीठानं (Aurangabad Bench) दिले आहेत. त्यानुसार ज्या ठिकाणी मांजाची विक्री आणि साठवणूक सापडेल त्यांच्यावर केवळ दंडात्मक कारवाया न करता ते ठिकाण सील करण्यात यावी. मांजाचा वापर करणाऱ्यांवर आणि वापर करणारे जर अल्पवयीन असतील, तर त्यांच्या पालकांवर कारवाई होणे सुद्धा गरजेचे आहे. (Nylon Manja)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.