उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ सरकार पुन्हा आल्यामुळे गुन्हेगारांच्या पोटात गोळा आला आहे. बुलडोझर बाबाच्या भीतीमुळे मागील 15 दिवसांत राज्यातील 50 हून अधिक गुन्हेगारांनी पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले आहे. यासोबतच या गुन्हेगारांनी पोलिसांसमोर भविष्यात कोणताही गुन्हा न करण्याची शपथ घेतली आहे. जे गुन्हेगार सध्या गरम दिसत आहेत. त्यांचा एप्रिल-मे महिन्याच्या उन्हाळ्यात शिमला करू, असा इशारा निवडणूक प्रचारादरम्यान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिला होता.
जीवे मारण्याची भीती
योगी सरकार परतल्यामुळे आता राज्यातील कुख्यात गुंडांपासून ते गल्लीबोळातील गावगुंडांना ते पोलीस चकमकीत ठार मारले जातील, त्यांच्या घरांवरही बुलडोझर फिरवला जाईल, अशी भीती आहे. या कारणास्तव हे गुंड गळ्यात पाटी अडकवून पोलीस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण करत आहेत. ‘मी आत्मसमर्पण करत आहे, कृपया मला गोळी मारू नका’, असे या फलकावर लिहिलेले असते. यासोबतच ते गुन्हेगारी विश्व कायमचे सोडण्याची शपथ घेत आहेत.
(हेही वाचा उत्तर प्रदेश कोणी जिंकवले, मोदींनी की योगींनी? गडकरी काय म्हणतात…)
गुन्ह्याबद्दल शून्य सहनशीलता
याबाबत माहिती देताना पोलीस अधिकारी म्हणाले की, राज्यातील गुन्हेगारी नष्ट करण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था सुधारण्यासाठी वेगाने आणि कडक कारवाई करण्यात येत आहे. राज्यात गुन्ह्याबद्दल शून्य सहिष्णुता आहे. 2017 मध्ये योगी आदित्यनाथ आल्यापासून राज्यात एकही दंगल झाली नाही.
कुठे, किती गुन्हेगार शरण आले?
- पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 10 मार्च 2022 पासून गुन्हेगारांचे आत्मसमर्पण सुरू झाले आहे.
- त्या दिवशी निकाल आल्यानंतर राज्यात योगी आदित्यनाथ यांचे सरकार येणार हे निश्चित झाले.
- 15 मार्च 2022 रोजी सहारनपूरमधील अपहरण आणि खंडणी प्रकरणात फरार असलेल्या गौतम सिंगने गोंडा जिल्ह्यातील छपिया पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले.
- तीन दिवसांत सहारनपूरच्या चिकलाना पोलीस ठाण्यात एकाच वेळी २३ गुन्हेगारांनी आत्मसमर्पण केले.
- देवबंदमध्येही चार गुन्हेगारांनी आत्मसमर्पण केले. गुन्हेगारी विश्व सोडून देऊ, अशी शपथ घेतली.
- शामलीमध्ये गोहत्या प्रकरणात 8 आरोपींनी गढीपुख्ता आणि ठाणे भवनच्या पोलिस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केले.