नैसर्गिक आपत्तीत वीज पडून मृत्यू झाल्यास आपदग्रस्तांना शासनाकडून आर्थिक मदत देण्यात येते. त्याच धर्तीवर उष्माघाताने मृत रुग्णांनाही मदत मिळण्याबाबत नैसर्गिक आपत्तीचा निकष लावावा, जेणेकरून आपदग्रस्तांना आर्थिक मदत मिळेल अशा सूचना विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिल्या आहेत. (Dr. Neelam Gorhe)
(हेही वाचा – Red Fort Attack Case: पाकिस्तानी दहशतवाद्याचा दयेचा अर्ज राष्ट्रपती मुर्मू यांनी फेटाळला)
उष्माघातामुळे मृत्यू पावलेल्या नागरिकांची नोंद होत नाही. त्यामुळे याबाबत आढावा शासन स्तरावून घेण्यात यावा. तसेच उष्माघाताने मृत व्यक्तीच्या वारसांना शासनाकडून आर्थिक मदतीची तरतूद नसल्याने आर्थिक मदत दिली जात नाही. त्यामुळे उष्माघातातील रुग्णांना मदतीबाबत निकष ठरविण्यासाठी तज्ज्ञांची समिती गठीत करावी, अशा सूचना उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. (Dr. Neelam Gorhe)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community