हरियाणातील पलवलहून नवी दिल्लीला जाणाऱ्या लोकल रेल्वेचा प्रगती मैदानाजवळ (Train Derailed In Delhi) अपघात झाला. प्रगती मैदानाजवळ लोकल रुळावरून घसरली. या प्रकारामुळे भारतात होणाऱ्या G20 शिखर परिषदेच्या तयारीत सहभागी अधिकारी आणि कर्मचारी यांच्यामध्ये खळबळ उडाली आहे. ‘या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. ट्रेनमधील सर्व प्रवासी सुरक्षित आहेत, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. 9 आणि 10 सप्टेंबर रोजी प्रगती मैदानावर G20 शिखर परिषद होणार आहे. या कार्यक्रमात देश-विदेशातील पाहुणे सहभागी होणार आहेत. सध्या G20 परिषदेची तयारी अंतिम टप्प्यात आहे. या पार्श्वभूमीवर हा प्रकार घडल्यामुळे खळबळ उडाली आहे.
(हेही वाचा – Udhayanidhi Defames Sanatan Dharma : उदयनिधी स्टॅलिन यांची सनातन धर्मावर गरळओक ! म्हणे, डेंग्यू, मलेरियाप्रमाणे सनातन धर्मालाही संपवायचे आहे !)
९ सप्टेंबरच्या सकाळी ९.४७ वाजता पलवल – नवी दिल्ली लोकल ट्रेन निजामुद्दीन ते टिळक ब्रिज दरम्यान अचानक रुळावरून घसरली. डाऊन मेन लाईनवर हा अपघात झाला. एक डबा रुळावरून घसरला. या मार्गावर दुसऱ्या मेन लाइन आणि ईएमयू मार्गावरून गाड्या सुरू राहतील.
भारतीय रेल्वेचे अधिकारी तपास करत आहेत – अधिकारी
दिल्लीतील भैरों मार्गाजवळ एक लोकल ईएमयू ट्रेन रुळावरून घसरली. यात कोणी जखमी झाल्याचे वृत्त नाही. सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. दुरुस्तीच्या कामासाठी रेल्वे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आहेत. दिल्लीतील प्रगती मैदानावर 9 आणि 10 सप्टेंबर रोजी होणारी जी-20 परिषद सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय गंभीर मानली जात आहे. सध्या घटनास्थळी पोहोचलेले भारतीय रेल्वेचे अधिकारी सर्व बाबी लक्षात घेऊन तपास करत आहेत, असे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले. (Train Derailed In Delhi)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community