बदलापूरमधील आदर्श विद्यालय (Adarsh Vidyalaya, Badlapur) शाळेत शिशू वर्गातील दोन विद्यार्थिंनीवरील सफाई कर्मचाऱ्यानी केलेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर, नागरिकांनी मंगळवारी बदलापूर रेल्वे स्थानकात जोरदार आंदोलन केले. या आंदोलनामुळे अवघ्या राज्याचे राजकारण तापले असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknaath Shinde) यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने या प्रकरणी सर्वच राजकीय पक्षांना राजकारण न करण्याचे आवाहन केले आहे. या घटनेचे कुणीही राजकारण करू नये, असे शिवसेना नेते संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) अॅक्टिंग करणाऱ्या नेत्या असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. (Sanjay Shirsat)
(हेही वाचा – Badlapur School Case प्रकरणातील आरोपीचे वकीलपत्र घेण्यास वकिलांचा नकार)
विरोधी पक्षातील लोकं यामध्ये संधी शोधत आहेत…
संजय शिरसाट म्हणाले की, या घटनेवरून सर्वांनी धडा घ्यायला हवा. आजही या घटनेचे पडसाद पाहायला मिळत आहेत. काही लोक यामध्ये संधी शोधण्याचा प्रयत्न करतात. त्यांनी भावनांचे राजकारण करू नये. लाठीचार्ज झाला ही दुर्दैवी गोष्ट आहे. मात्र हे करावे लागले. आता शाळा कुठल्या पक्षाची आहे याची चर्चा केली जात आहे. मात्र राज्यात ९५ टक्के संस्था या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आहेत. त्यामुळे यामध्ये राजकारण आणू नये, असे मत शिरसाट यांनी व्यक्त केले.
(हेही वाचा – ‘मिशन काश्मीर’ जिंकण्यासाठी BJP ची योजना; संघाचे राम माधव पुन्हा मैदानात)
आणि त्या अॅक्टिंग करणाऱ्या नेत्या..
संजय शिरसाट यांनी यावेळी सुप्रिया सुळे यांच्यावर देखील जोरदार टीका केली. सुप्रिया सुळे ह्या राजकारणात काम करण्यापेक्षा अॅक्टिंग करत आहेत. त्यांच्या काळात अनेक घटना घडल्या. त्या आम्ही सांगू शकतो. मात्र आम्ही तू – तू मै – मै करणार नाही, असे ते म्हणाले. (Sanjay Shirsat)
हेही पाहा –