पुन्हा भाज्या महागणार! कारण…

119

सध्या हरियाणा व सभोवती पश्चिम चक्रवादळ सक्रिय झाले आहे.त्याचप्रमाणे पश्चिम राजस्थान व विदर्भावर कमी दाबाची द्रोणीय स्थिती निर्माण झाल्याने अकोल्यामध्ये मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास जोरदार वाऱ्यासह विजांचा कडकडाटात अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे शेतात असलेल्या हरभरा आणि गव्हाच्या पिकाचे नुकसान झाले आहे. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची धावपळ उडाली आहे. जिल्ह्यातील काही भागात प्रचंड गारपीट झाली असून वातावरणातील बदलाने शेतकरी चिंतातुर झाला आहे. हवामान वेधशाळेने पुढील दोन दिवस विदर्भासह अमरावती जिल्ह्यात पाऊस व गारपिटीचा अंदाज वर्तवला असताना शेतकरी चिंतातुर होता. अशातच आज सकाळच्या सुमारास जिल्ह्यातील चांदुर बाजार तालुका अंतर्गत येणाऱ्या घाटलाडकी,बेलमंडळी,वणी-बेलखेड,नागरवाडी या भागात तुफान गारपीट झाली. यामुळे भाज्यांचे दर वाढणार आहेत.

पावसाची जोरदार हजेरी

हवामान विभागाने विदर्भात अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. त्यानुसार सकाळपासून ढगाळ वातावरण होते. तसेच वातावरणातील थंडीही गायब झाली आहे. दरम्यान, दुपारी पावणेदोनच्या सुमारास रिमझिम पावसाने हजेरी लावली. थोड्याच वेळाने विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यासह पावसाने जोरदार हेजरी लावली. जवळपास एक ते दीड तास पाऊस पडत राहिला.

( हेही वाचा :अखेर ‘तो’ दगड प्रभादेवी मंदिरासमोरून हटवलाच…)

पिकांचे नुकसान

जोरदार पावसासोबत गारांचाही वर्षाव झाला. काही भागात तुरळक तर काही भागात जास्त प्रमाणात गारांचा पाऊस पडला. लहान स्वरूपाच्या गारा पडल्या. विशेष म्हणजे, संपूर्ण पावसाळ्यात गारांचा पाऊस पडला नव्हता. गडद ढगांमुळे वातावरणात काळोख निर्माण झाला होता. भर दुपारी सायंकाळ झाल्याचा अनुभव अकोलेकरांना होत होता. दरम्यान, या अवकाळी जोरदार पावसामुळे शेतातील हरभरा, तूर आणि गहू पिकांचे नुकसान झाले आहे. बहरावर आलेला हरभरा आणि लवकर पेरलेल्या हरभऱ्याच्या गाठा खाली पडल्या. तूर काढणीवर आलेली असताना पावसामुळे या पिकांचे नुकसान झाले आहे. जोरदार वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. जोरदार वाऱ्यामुळे कौलखेड रस्त्याने झाडांची पडझड झाली. तसेच काही ठिकाणी पान टप-याही पडल्याच्या घटना घडल्या. अमरावता जिल्ह्यात तूर कापणीचा हंगाम सुरू आहे. तूर कापणीला मजूर मिळत नसल्याने अनेक शेतक-यांच्या तुरी शेतात पडून आहेत. अशातच आज झालेल्या गारपिटीने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असून तुरीची प्रतवारी सुद्धा खालावली आहे.संत्र्याच्या आंबिया बहारावर सुद्धा याचा दुष्परिणाम झाला असून यामुळे संत्रा वर डाग पडून प्रतवारी घालवण्याची भीती शेतकऱ्यांनी वर्तविला आहे. विदर्भात २८,२९ डिसेंबरला विदर्भात अमरावती, वर्धा, गोंदिया, नागपूर भंडारा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाट हलक्या गारपिटीची शक्यता अमरावती येथील शिवाजी महाविद्यालयाचे हवामान तज्ञ अनिल बंड यांनी वर्तविली होती. त्याच पार्श्वभूमीवर आज संपूर्ण जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून काही ठिकाणी मुसळधार पावसासह गारपीट झाल्याने शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून ताप, सर्दी व खोकल्याचे रुग्ण सुद्धा वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.