वसुबारसने दिवाळीची (Deepawali) सुरुवात झाली असून, नरकचतुर्थी, लक्ष्मीपूजन, पाडवा, भाऊबीज असा हा आनंदोत्सव द्विगुणित होत जाणार आहे. बाजारपेठेतही दिवाळीचा उत्साह दिसून येत आहे. लक्ष्मीपूजन आणि पाडव्याच्या पार्श्वभूमीवर पारंपरिक पूजा साहित्यासह फटाके, कपडे, मिठाई, गृहोपयोगी वस्तू, इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीसाठी नागरिकांची शहरातील बाजारात लगबग दिसून येत आहे. दिवाळी पाडवा हा वर्षातील साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो.
व्यापाऱ्यांसाठी महत्त्वाचा दिवस. या पार्श्वभूमीवर सोमवारी बाजारपेठेत पूजासाहित्य, कीर्द, खतावण्या, रोजमेळ आदी साहित्यांची मोठ्या प्रमाणात खरेदी होत होती. याशिवाय मधला अंबा मंदिर परिसर, मोची गल्ली जवाहर रोड, रुख्मिणी सुका मेवा गिफ्ट्सचे यंदा आकर्षण दिवाळीच्या उत्सवात अलीकडच्या काळात सुकामेवा आणि चॉकलेट्सचे गिफ्ट बॉक्स देण्याची क्रेझ वाढत आहे. यंदाही विविध आकर्षक बांधणी असलेले गिफ्ट बॉक्स बाजारात आले आहेत. त्यामध्ये लखनवी व दिल्लीहून आलेल्या सुकामेव्यांच्या गिफ्ट बॉक्सना अधिक मागणी आहे. याशिवाय भारतीय कंपन्यांसह विदेशी कंपन्यांचे चॉकलेट गिफ्ट बॉक्सची खरेदी मोठ्या प्रमाणावर होत आहे. नगर, अन्य परिसरात पूजेसाठी लागणारे केळी खुंट, विड्याची पाने, लक्ष्मीची मूर्ती, डाळिंब, पेरू, सफरचंद, सीताफळ, मोसंबी, केळी, चिकू, आवळा आणि इतर फळांचीही खरेदी करण्यात येत आहे. तसेच बत्तासे, साखर-फुटाणे, लाह्या, भेंड, फुटाणे आदी वस्तूंनाही मागणी दिसून आली. (Deepawali)
(हेही वाचा Assembly Election मध्ये शतक मारण्याची भाषा करणारा उबाठा जागा वाटपात ९६ वर आऊट)
या एकत्रित वस्तूंची किंमत बाजारपेठेत शंभर रुपये किलोपर्यंत आहे. शिवाय सुगंधी उटणे, राजकोट तेल त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे धूप, अगरबत्ती यांचीही विक्री होत आहे. दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाचे महत्त्व लक्षात घेऊन फुलांच्या बाजारातही झेंडू आणि इतर फुलांची मोठी आवक झाली. परंपरेला मान देत वहीपूजन रोजमेळ, कीर्द खतावणी, नोंदवही, लक्ष्मी वही, कलेक्शन बुक या रोजच्या जमा खर्चाच्या वह्या संगणकीय युगात कालबाह्य होऊ लागल्या असल्या तरी धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सहा-सात प्रकारच्या वह्यांऐवजी मुहूर्तासाठी एखादी वही खरेदी करण्याकडे कल दिसून आला. यंदा विक्रीत घट झाली असली तरी व्यापारी पेढ्या, दुकाने, कारखाने, उद्योगधंद्यांच्या दृष्टीने पाडव्याला वहीपूजनाचे महत्त्व असल्याने परंपरेला मान देत आजही वही खरेदी होते.
Join Our WhatsApp Community