Crude Oil Import : भारताची रशियाकडून तेल आयात विक्रमी स्तरावर

Crude Oil Import : रशिया भारताचा सगळ्यात मोठा तेल निर्यातदार देश बनला आहे.

119
Crude Oil Import : भारताची रशियाकडून तेल आयात विक्रमी स्तरावर
  • ऋजुता लुकतुके

रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून रशियाकडून माल आयात करण्यावर पाश्चिमात्य देशांनी बंदी घातली आहे. पण, त्याचा फायदा भारताला रशियाकडून तेल आयात करण्यात होतो आहे. भारताला रशियन चलनात आणि कमी किमतीत कच्चं तेल मिळत आहे. म्हणता म्हणता मागच्या २ वर्षांत रशिया हाच भारताचा सगळ्यात मोठा तेल पुरवठादार देश बनला आहे. तर रशियाकडूनही तेल विकत घेण्याच्या बाबतीत भारताने चीनला मागे टाकून पहिला क्रमांक पटकावला आहे. (Crude Oil Import)

जुलै महिन्यात भारताने आयात केलेल्या कच्च्या तेलात रशियन कच्च्या तेलाचा वाटा ४४ टक्के होता. चीनच्या तेल शुद्धीकरण कंपन्यांनी नफ्याचे प्रमाण कमी केल्यामुळं रशियाकडून कमी कच्चे तेल आयात केले आहे. रॉयटर्सच्या अहवालानुसार, जुलै २०२४ मध्ये भारताने आयात केलेल्या भारत दररोज २.०७ दशलक्ष बॅरल इतकं कच्चं तेल रशियाकडून विकत घेतलं आहे. जून २०२४ च्या तुलनेत हे प्रमाण ४.२ टक्के अधिक आहे आणि एक वर्षापूर्वीच्या तुलनेत १२ टक्के अधिक आहे. चीन पाइपलाइन आणि शिपमेंटद्वारे रशियाकडून दररोज १.७६ दशलक्ष बॅरल कच्चे तेल आयात केले आहे.

(हेही वाचा – ICC Test Ranking : आयसीसी क्रमवारीत भारतीयांचाच दबदबा, रोहित दुसऱ्या स्थानावर, विराट कुठे?)

भारताला कच्च्या तेलाचा पुरवठा करणारा ‘हा’ दुसरा सर्वात मोठा देश

फेब्रुवारी २०२२ मध्ये रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर, पाश्चात्य देशांनी रशियावर आर्थिक निर्बंध लादले होते. त्याचे तेल आणि वायू खरेदीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर भारताने रशियाकडून स्वस्त दरात कच्च्या तेलाची खरेदी सुरू केली आणि देशांतर्गत रिफायनरी कंपन्यांना त्याचा मोठा फायदा झाला. युद्ध सुरू झाल्यापासून भारताचा रशियासोबतचा व्यापार वाढला आहे. भारतीय रिफायनरी कंपन्यांनी रशियातून कच्च्या तेलाची स्वस्त दरात आयात केली, त्याचे शुद्धीकरण करून पेट्रोल डिझेल जागतिक बाजारपेठेत विकले, त्यातून प्रचंड नफा कमावला. यामुळे जगभरातील पेट्रोलियम पदार्थांच्या महागाईला आळा बसण्यास मदत झाली आहे. (Crude Oil Import)

रशियानंतर, भारताला कच्च्या तेलाचा पुरवठा करणारा इराक हा दुसरा सर्वात मोठा देश आहे. त्यानंतर सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीचा क्रमांक लागतो. जुलै महिन्यात मध्यपूर्वेतील देशांकडून भारताच्या कच्च्या तेलाच्या खरेदीत ४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. भारतासाठी चांगली गोष्ट म्हणजे रशियाकडून स्वस्त दरात कच्च्या तेलाची आयात करण्याबरोबरच आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीही घसरत आहेत. दरम्यान, सर्वांना एकच प्रश्न पडला असेल की, पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होणार की घट होणार? मिळालेल्या माहितीनुसार पुढच्या काळात दरात घसरण होण्याची शक्यता आहे. (Crude Oil Import)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.