सीएसएमटी-कर्जत रेल्वे प्रवासाचा वेळ 30 मिनिटांनी कमी होणार

मुंबईत रेल्वे लोकलने प्रवास करणे सर्वात सोयीस्कर समजले जाते. सीएसएमटी-कर्जत (CSMT-Karjat) रेल्वेप्रवासासाठी लागणारा वेळ कमी होणार असून,  सीएसएमटी ते कर्जत व्हाया पनवेल या पर्यायी मार्गामुळे मुंबईकरांच्या प्रवासात २५ ते ३० मिनिटांची बचत होणार आहे.

मुंबईकरांच्या प्रवासात २५ ते ३० मिनिटांची बचत

पनवेल ते कर्जत या एकूण २९.६ किलोमीटच्या रेल्वे मार्गिकेमुळे मुंबईकरांच्या प्रवासाच्या वेळेत मोठी बचत होणार आहे. सध्या कर्जत ते सीएसएमटीला धीम्या लोकलने येण्यासाठी २ तास १९ मिनिटे लागतात. हा मार्ग कर्जत ते सीएसएमटी व्हाया पनवेल असा जोडला गेल्याने हा लोकल प्रवास १ तास ५० मिनिटांचा होणार आहे. या प्रकल्पासाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळाला २ हजार ७८२ कोटींचा निधी मंजूर झाला आहे.

( हेही वाचा : मुंबईतील ‘बेस्ट’ Bus Stop सुशोभित होणार!)

सध्या पनवेल आणि कर्जत यांना जोडणारा एकेरी मार्ग पनवेल, खालापूर आणि कर्जत या तालुक्यांमधून जातो. या मार्गाचे दुहेरीकरण करण्यात येणार आहे. सध्या या मार्गावर दोन बोगदे आहेत मात्र नव्या मार्गावर तीन बोगदे बांधण्यात येणार आहेत. २२० लांबीचा एक बोगदा नधालजवळ बांधला जात असून दुसरा सुमारे २६०० मीटर लांबीचा आणि तिसरा वावराळे आणि कर्जतदरम्यान बांधला जात आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here