मोठी बातमी: मध्य रेल्वेच्या लोकलला आग; प्रवाशांनी काढला पळ

201

मध्य रेल्वेने प्रवास करणा-या प्रवाशांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. मध्य रेल्वेच्या आसनगाव स्थानकाजवळ लोकल ट्रेनच्या एका डब्याला आग लागल्याची घटना घडली आहे. धूर येऊ लागल्याचे दिसताच प्रवाशांनी जीव वाचवण्यासाठी लोकलमधून उडी मारुन पळ काढला. वेळीच आग आटोक्यात आल्याने तसेच, आग विझवल्याने मोठी दुर्घटना टळली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. ही आग लोकलच्या चाकाला लागल्याचे सांगितले जात आहे.

( हेही वाचा: बोरिवलीतील केंद्रीय दूरसंचार विभागाच्या साडेपाच एकर जागेवरील अतिक्रमण साफ; एकाच दिवसात हटवली ५५ बांधकामे )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.