सीएसएमटीचे फलाट वाढता वाढता वाढे…

165

मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर 24 डब्ब्यांची एक्स्प्रेस उभी करण्यासाठी फलाटांचे विस्तारीकरण केले जाणार आहे. त्यामुळे आता लवकरच 24 डब्ब्यांची एक्स्प्रेस उभी राहणार आहे.

50 कोटींची तरतूद

मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस आणि पश्चिम रेल्वेवर वांद्रे टर्मिनसवर सुधारणा करण्यात येत आहेत. या तिन्ही टर्मिनसची प्रवासी क्षमता वाढवण्यावर आणि जादा डब्ब्यांची एक्स्प्रेस उभी राहणारे फलाट तयार करण्यात येणार आहेत. या तिन्ही टर्मिनसच्या विकासकामांच्या यंदाच्या अर्थसंकल्पात एकूण 50 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या कामांसाठी दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे.

( हेही वाचा :लांब पल्ल्याच्या रेल्वे प्रवाशांनो, मासिक पास एक्स्प्रेसमध्ये चालणार नाही…)

अर्थसंकल्पात तरतूद

सीएसएमटीच्या लांब पल्ल्याच्या फलाट क्रमांक 10,11,12 आणि 13 विस्तारीकरण करण्यात येणार आहे. यासाठी अर्थसंकल्पात सुमारे 20 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. मुंबईकडे येणा-या आणि मुंबईबाहेर जाणा-या 100 मेल एक्स्प्रेसच्या फे-या होतात, फलाटांचे विस्तारीकरण झाल्यास,जादा डब्ब्यांच्या एक्सप्रेसची सुविधा प्रवाशांना मिळणार आहे. पश्चिम रेल्वेच्या वांद्रे टर्मिनसच्या विस्तारिकरणासाठी अर्थसंकल्पात दहा कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

सीसीटीव्ही प्रक्रिया मंदावली

प्रवाशांची सुरक्षा आणि गुन्ह्यांची संख्या कमी करण्यासाठी सीसीटीव्ही बसवण्याची योजना आखण्यात आली आहे, मात्र गेल्या चार वर्षांत उपनगरी रेल्वेगाड्यांसह मेमू आणि डेमूच्या डब्यांत सीसीटीव्ही बसवण्याची प्रक्रिया मंदावली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.