महाविकास आघाडीच्या मोर्चामुळे सीएसएमटीकडे जाणारा ‘हा’ मार्ग बंद; अशी असेल पर्यायी व्यवस्था

208

महाविकास आघाडी पक्षाकडून शनिवारी आझाद मैदान येथे मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यामुळे मोर्चा दरम्यान डॉ.बी.ए.आंबेडकर मार्गावरून दक्षिण मुंबईकडे जाणाऱ्या वाहतुकीवर मोठ्या प्रमाणात परिणाम होणार आहे. डॉ. बी.ए .आंबेडकर मार्गावरून मुंबईकडे जाणारा रिचर्डसन्स क्रुडास कंपनी ते सर जे. जे. उड्डाणपुल- डॉ. दादाभाई नौरोजी रोड- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- टाईम्स ऑफ इंडिया इमारत हा मार्ग शनिवारी सकाळी वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे. शनिवारी मुंबईकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन मुंबई वाहतूक विभागाकडून करण्यात आले आहे.

( हेही वाचा : ‘एमएमआरडीए’च्या धर्तीवर कोकण क्षेत्र विकास प्राधिकरण स्थापन करणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा )

मोर्चादरम्यान सकाळी १० ते सायंकाळी मोर्चा समाप्तीपर्यंत वाहतूक व्यवस्थेचे खालीलप्रमाणे नियोजन करण्यात आले आहे…

वाहतुकीकरीता बंद मार्ग

रिचर्डसन्स डा मिल- सर जे. जे. उड्डाणपुल डॉ. दादाभाई नौरोजी रोड- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- टाईम्स ऑफ इंडिया इमारत.

मुंबईकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी आपल्या इच्छीत स्थळी पोहचण्याकरीता खालील पर्यायी मार्गाचा वापर करावा.

१) डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडने दक्षिण मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांनी गॅस कंपनी – चिंचपोकळी पुलावरून- ‘ऑर्थर रोड-सात रस्ता सर्कल – मुंबई सेंट्रल – डॉ. दादासाहेब भंडकमकर मार्ग (लॅमिग्टन रोड ) – ओपेरा हाऊस – महर्षी कर्वे रोडचा (क्वीन्स रोड) वापर करावा.

किंवा

सात रस्ता सर्कल – मुंबई सेंट्रल-ताडदेव सर्कल – नाना चौक- एन. एस. पुरंदरे मार्ग या पर्यायी मार्गाचा सुध्दा वापर करू शकतात.

२) भायखळा येथून दक्षिण मुंबईकडे जाण्याकरीता डॉ. बी. ए. रोड खडा पारसी- नागपाडा जंक्शन- दोन

टाकी जंक्शन- जे. जे. जंक्शन महम्मद अली रोड याचा वापर करावा.

किंवा

नागपाडा जंक्शन – मुंबई सेंट्रल-ताडदेव सर्कल-नाना चौक एन. एस. पुरंदरे मार्ग या पर्यायी मार्गाचा सुध्दा वापर करू शकतात.

३) भायखळा / जिजामाता उदयान (राणीची बाग) येथुन दक्षिण मुंबईकडे जाण्यासाठी संत सावता मार्गाने मुस्तफा बाजार-रे रोड रिलप रोड-बॅरिस्टर नाथ पै मार्गाने पुढे पी.डीमेलो रोडने पुढे सी.एस.एम.टी. कडुन इच्छीत स्थळी.

४) परेल व लालबाग येथून दक्षिण मंबईकडे जाण्याकरीता बावला कंम्पाऊंड टी.बी. कदम मार्गाने व्होल्टस कंपनी उजवे वळण तानाजी मालुसरे मार्ग अल्बर्ट जंक्शन-उजवे वळण बॅरिस्टर नाथ पै मार्गाचा वापर करावा.

५) मध्य मुंबई कडून दक्षिण मुंबईकडे जाण्यासाठी चार रस्ता-आर. ए. किडवाई मार्गाने बॅरिस्टर नाथ पै मार्गाने – पी.डीमेलो रोडचा वापर
करावा.

६) नवी मुंबई, पुणे, ठाणे व नाशिक येथून दक्षिण मुंबईकडे जाण्याकरीता देवनार आयओसी जंक्शन पूर्व – मुक्त मार्ग (Eastern Free way) पी. डिमेलो रोडचा वापर करावा. किंवा नवी मुंबई व पुणे येथून दक्षिण मुंबईकडे जाण्याकरीता चेंबूर पांजरपोळ जंक्शन पूर्व मुक्त मार्ग (Eastern Free way)- पी. डिमेलो रोड याचा वापर करावा.

७) दक्षिण मुंबई येथून उत्तर आणि पश्चिम मुंबई करीता महापालिका मार्ग मेट्रो जंक्शन – जगन्नाथ शंकर शेठ रोड- प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाण पुल – मरीन ड्राईव्ह मार्ग याचा वापर करावा.

८) दक्षिण मुंबई कडून मध्य मुंबई तसेच नवीमुंबई, पुणे, ठाणे व नाशिक करीता पी.डिमेलो रोडचा वापर करून पुर्व मुक्त मार्गे (Eastern Free way) इच्छीतस्थळी जाऊ शकतात.

९) दक्षिण मुंबईकडून मध्य मुंबई करीता महिर्षी कर्वे रोड / मरिन ड्राईव्ह – ओपेरा हाऊस – लॅमिंटन रोड – मुंबई सेंट्रल – सात रस्ता – चिंचपोकळी – डॉ. बी. ए. रोड याचा वापर करावा.

किंवा

महिर्षी कर्वे रोड / मरिन ड्राईव्ह – नाना चौक ताडदेव सर्कल मुंबई सेंट्रल सात रस्ता – चिंचपोकळी – डॉ. बी. ए. रोड याचा वापर करावा. –

१०) सीएसएमटी स्टेशनकडुन पायधुनी, भायखळा, नागपाडा येथे जाण्याकरीता महापालिका मार्ग- मेट्रो जंक्शन- एल.टी. मार्ग चकाला डावे वळण- जे.जे. जंक्शन – दोन टाकी- नागपाडा जंक्शन – खडा पारसी जंक्शन मार्गे इच्छीतस्थळी जाऊ शकतात.

पार्किंगची पर्यायी व्यवस्था 

New Project 9 6

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.