- सचिन धानजी, मुंबई
मुंबई महापालिकेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस वरून बाहेर पडण्याच्या भुयारी मार्गाचे काम मागील तीन महिन्यांपासून सुरू आहे. मात्र आजही येथे भुयारी मार्गातील पायऱ्यांचं काम अर्धवटच असून रेल्वे स्थानकावरून भुयारी मार्गातून ये-जा करणाऱ्या रेल्वे प्रवाशांना या कामामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. ज्या तीन महिन्यांमध्ये महापालिका करोडो रुपयांची कामे पूर्ण करत असतात, त्याच कालावधीत महापालिकेला या भुयारी मार्गातील १७ ते १८ पायऱ्यांचं काम पूर्ण करण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी कमी पडतोय याबाबत आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. (CSMT Subway)
भुयारी मार्गाची डागडुजी सुरु
दक्षिण मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील भुयारी मार्गाचा कायापालट करून त्याचे नुतनीकरण करण्याचे काम महापालिकेच्यावतीने हाती घेण्यात आले आहे. मागील मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात या भुयारी मार्गाची डागडुजी सुरु आहे. विशेष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस भुयारी मार्गाच्या नुतनीकरणासह अनेक पायऱ्या आणि भिंतींवरील टाईल्स तुटल्याने त्याच्या दुरुस्तीचं काम तातडीने घेण्याची मागणी होत होती. त्यानुसार महापालिकेने कंत्राटदाराची नेमणूक केली आहे. या भुयारी मार्गाच्या कामासाठी सुमारे कोटींहून अधिक रुपये खर्च केले जात आहे. महापालिकेने या कामांसाठी डी बी इन्फ्राटेक या कंपनीची निवड केली आहे. (CSMT Subway)
‘महापालिका रेल्वे प्रवाशांना देणार प्रसाद’
या कंपनीच्या वतीने भुयारी मार्ग प्रवेश क्रमांक तीन पायऱ्यांवर मार्बल वजा लाद्या बसवण्यात आल्या. या लाद्यांवरून पाय घसरुन पडण्याची भीती प्रवाशांकडून व्यक्त केली गेली जात असल्याने याबाबत हिंदुस्थान पोस्टने ‘महापालिका रेल्वे प्रवाशांना देणार प्रसाद’ या आशयाचं वृत्त प्रकाशित केलं होतं. यानंतर महापालिकेने लावण्यात आलेल्या पायऱ्यांवरील लाद्या या खडबडीत (रफ) करण्याचा प्रयत्न केला. मात्र आजही या लाद्या पावसात चालण्यास योग्य नसून यामुळे पावसात पाय घसरून पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (CSMT Subway)
(हेही वाचा – CSMT Subway : महापालिका देणार रेल्वे प्रवाशांना ‘ प्रसाद’)
सर्व लाद्या नव्याने उखडून काढण्यात आल्या
दरम्यान, रेल्वे स्थानकावरून बाहेर पडणाऱ्या मुख्य भुयारी मार्गाच्या एका बाजूच्या पायऱ्या बदलण्याचं काम एप्रिल महिन्यातच हाती घेण्यात आलं होतं, या पायऱ्यांरील काळ्या रंगाच्या लाद्या या सुस्थितीत होत्या. मात्र नवीन मार्बल वजा लाद्या बसवण्यासाठी पूर्वीच्या सर्व लाद्या काढून पायऱ्यांचं नवीन बांधकाम करण्यात आलं. मात्र या पायऱ्यांची संख्याच (स्टेप) चुकल्यामुळे पुन्हा या सर्व लाद्या नव्याने उखडून काढण्यात आल्या आणि त्यानंतर एक ते दीड महिने काम बंद ठेवण्यात आलं आणि या ऐवजी प्रवेश क्रमांक एक वरील भुयारी मार्गावरील पायऱ्यांच्या लाद्या बसवण्याचे काम हाती घेतलं गेलं. (CSMT Subway)
पायऱ्यांचं गणित अजूनही जुळेना…
या ठिकाणी नवीन पद्धतीच्या जुन्या मार्बल व जागा लावण्यात आल्या, मात्र रेल्वे स्थानकावरून बाहेर येणाऱ्या मुख्य भुयारी मार्गाच्या प्रवेशद्वारावर पूर्वी बसवण्यात आल्या. नवीन बसवलेल्या लाद्या काढून पुन्हा जुन्याच पद्धतीच्या काळ्या रंगाच्या लाद्या बसवण्यात येत आहेत. कंत्राटदारांच्या कर्मचाऱ्यांना या पायऱ्यांचं गणित अजूनही जुळवून आणता येत नसल्याने त्यांचं काम अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे. मागील तीन महिन्यांपासून मुख्य मार्गाची एक बाजू पूर्णपणे कामकाजाकरिता बंद करून ठेवण्यात आली आहे. (CSMT Subway)
आयुक्तांच्या नाकासमोर अत्यंत विलंबाने काम
त्यामुळे प्रवाशांना अन्य दोन मार्गातून ये-जा करावी लागते मात्र याच दोन प्रवेश मार्गावर मोठ्या प्रमाणात फेरीवाले बसत असल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होते आणि भुयारी मार्गाच्या मुख्य प्रवेशद्वारातून रेल्वे स्थानकात शिरताना संध्याकाळ आणि सकाळच्या वेळेला प्रचंड गर्दी होते आणि या गर्दीमुळे अनेकांना ठराविक रेल्वे गाडी सुटली जाते. त्यामुळे महापालिकेने हाती घेतलेल्या कामाबाबत तीव्र नाराजी वेगळी प्रवेशांकडून व्यक्त केली जात आहेत. महापालिका आयुक्तांच्या नाकासमोर अत्यंत धिम्या गतीने आणि विलंबाने काम चालत असेल तर अन्य प्रकल्पांमध्ये कंत्राटदार कसे काम करत असतील असा प्रश्न आता सामान्य जनतेकडून उपस्थित केला जात आहे. (CSMT Subway)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community