- सचिन धानजी,मुंबई
दक्षिण मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनस (CSMT Subway) येथील भुयारी मार्गाच्या नूतनीकरणाचे काम सध्या सुरू असून या कामांमध्ये सिरॅमिक टाईल्सचा वापर केला जात असल्याने या लाद्यांवरून पाय घसरून पडण्याची भीतीच आता रेल्वे प्रवाशांकडूनच व्यक्त केली जात आहे. सध्या या नूतनीकरणात चकाकी असणाऱ्या लाद्या लावून भुयारी मार्गाचे सुशोभीकरण केले जात असले तरी या भागात असलेल्या मुंबई महापालिका (Mumbai Municipality),मंत्रालय (ministry), बेस्ट (Best) यासारख्या सहकारी कार्यालयांसह इतर खासगी आणि निमशासकीय कार्यालयातील कर्मचारी हा आपली गाडी वेळेत पकडण्यासाठी धावपळ करत असतात. त्यामुळे घाई गडबडीत धावत जात गाडी पकडण्याच्या नादात पावसाळ्यात या लादीवरून पाय घसरून जायबंदी होण्याचीच शक्यताच आता सर्वाधिक निर्माण झाली आहे. त्यामुळे या लाद्या लावून एक प्रकारे महापालिकेने रेल्वे प्रवाशांना पावसाळ्यात प्रसाद देण्याची व्यवस्था केली आहे. (CSMT Subway)
दक्षिण मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील भुयारी मार्गाचा कायापालट करून त्याचे नुतनीकरण करण्याचे काम महापालिकेच्यावतीने हाती घेण्यात आले आहे. मागील 20 ते 25 दिवसांपासून या भुयारी मार्गाची डागडुजी सुरु आहे. मात्र, या कालावधीत अनेक सार्वजनिक सुट्टया असल्याने सरकारी तसेच खासगी कार्यालये बंद होती. त्यामुळे लोकांची तसेच प्रवाशांची वर्दळ कमी असल्याने या भुयारी मार्गाचे काम विनाअडथळा करण्याची पूर्ण संधी असतानाही कंत्राटदाराकडून याचे काम विलंबाने केले जात आहे. त्यामुळे अर्धवट कामानंतरही हा मार्ग प्रवाशा तसेच पादचाऱ्यांसाठी खुला करून द्यावा लागत आहे. परिणामी आधीच विलंबाने काम आणि त्यातच अर्धवट कामांवरून पादचाऱ्यांची ये-जा होत असल्याने या कामाची वाट लागली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (CSMT Subway)
याबाबतचे वृत्त ‘हिंदुस्तान पोस्ट’ प्रकाशित केल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून प्रत्यक्षात कामाला युद्ध पातळीवर सुरू झाले. परंतु येथील भुयारी मार्ग क्रमांक तीन च्या आतील बाजूस सिरॅमिक मार्बल टाइल्स बसवल्या जात आहेत. या लाद्या अत्यंत गुळगुळीत आहेत. या लाद्यांवरून चालताना एक प्रकारची भीती प्रवाशांच्या मनात निर्माण होऊ लागली आहे. या कामाला सुरुवात करून सिरॅमिक मार्बल लाद्या बसवण्याबाबत रेल्वे प्रवाशांकडूनच भीती व्यक्त केली जात आहे. (CSMT Subway)
(हेही वाचा- Cases against MLAs & MPs : आमदार आणि खासदार यांच्या विरोधातील २,३३१ फौजदारी खटले विशेष न्यायालयांत प्रलंबित)
सरकारी कार्यालयातील कर्मचारी तथा प्रवासी यांनी व्यक्त केलेल्या भीतीप्रमाणे, नियमित गाडी पकडण्यासाठी सबवे मध्ये घाईघाईत उतरून धावत लोकल पकडण्याची वेळ प्रवाशांना येते. त्यामुळे घाईघाईत पायऱ्या उतरून टाईल्स वरून धावत जाताना पाय घसरून पडण्याची भीती प्रवाशांकडून व्यक्त होऊ लागली आहे. विशेष म्हणजे पावसाळ्यात या जिन्यावरून पाणी पावसाचे पाणी उतरत असल्याने किंबहुना या पायऱ्या ओल्या झाल्यामुळे आतील भागातही पावसाचे पाणी लाद्यावर पसरण्याची शक्यता आहे. आणि त्यामुळे पावसाळ्यात धावत गाडी पकडण्याचा प्रयत्नात पाय घसरून पडण्याची शक्यता अधिक निर्माण झाली आहे. पाय घसरून पडल्यास प्रवाशी जायबंदी होईल. त्यांच्या हातापायाला इजा होईल. (CSMT Subway)
त्यामुळे पूर्वीप्रमाणेच लाद्या बसवल्या जाव्यात. मात्र या लाद्या बसवताना प्रवाशी तथा पादचारी कुठेही या लाद्यांवरून पाय घरून पडणार नाही अशा प्रकारच्या लाद्यांचा वापर या ठिकाणी केला जावा अशी मागणी ही प्रवाशांकडून केली जात आहे. (CSMT Subway)
(हेही वाचा- विधवा महिलांना न्याय मिळवून देणारे Maharshi Karve)
पायऱ्या आणि भिंतींवरील टाईल्स तुटल्याने ..
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस भुयारी मार्गाच्या नुतनीकरणासह अनेक पायऱ्या आणि भिंतींवरील टाईल्स तुटल्याने त्याच्या दुरुस्तीसाठी महापालिकेने कंत्राटदाराची नेमणूक केली आहे. या भुयारी मार्गाच्या कामासाठी सुमारे कोटींहून अधिक रुपये खर्च केले जात आहे. महापालिकेने या कामांसाठी डी.बी इन्फ्राटेक या कंपनीची निवड केली आहे. (CSMT Subway)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community