![CSMT Subway : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससह चर्चगेट आणि मेट्रोजवळील भुयारी मार्ग कायमच राहणार साफसूफ CSMT Subway : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससह चर्चगेट आणि मेट्रोजवळील भुयारी मार्ग कायमच राहणार साफसूफ](https://www.marathi.hindusthanpost.com/wp-content/uploads/2025/02/New-Project-17-1-696x377.webp)
-
विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT), चर्चगेट आणि क्रांतीवीर वासूदेव बळवंत फडके चौक येथील मेट्रो सिनेमा आदी ठिकाणचे भुयारी मार्ग (CSMT Subway) आता चकाचक केले जाणार आहेत. या भुयारी मार्गाच्या दैनदिन स्वच्छतेसाठी महापालिकेच्यावतीने कंत्राटदाराची नियुक्त् करण्यात येत असून यासाठी महापालिका प्रशासनाच्यावतीने निविदा मागवण्यात आली आहे. या निविदा प्रक्रियेनंतर सर्व भुयारी मार्गांमधील दैनंदिन स्वच्छतेसाठी खासगी संस्थेच्यावतीने कर्मचारी वर्ग तैनात केला जाणार आहे.
मुंबई शहर (Mumbai city) भागात मध्य रेल्वे (Central Railway) मार्गाच्या मुख्य रेल्वे स्थानक आणि रेल्वे कार्यालये असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस येथील रेल्वे स्थानक याला जोडून असलेल्या भुयारी मार्गातून (CSMT Subway) दररोज हजारो रेल्वे प्रवासी, पादचारी ये -जा करत असतात. या भुयारी मार्गाचा सरकारी आणि खासगी कार्यालयातील नोकरदार वर्ग वापर करत असतात तसेच पर्यटक आणि विदेशी पर्यटक याठिकाणी पाहणी करण्यास येत असल्याने या ठिकाणी कायमच गर्दी दिसून येत असते.
(हेही वाचा – अतिक्रमण करणाऱ्यास मोफत घरांचे बक्षीस मिळते; Bombay High Court ची सरकारवर उपहासात्मक टीका!)
सीएसएमटीमधील भुयारी मार्गामध्ये (CSMT Subway) अनेक प्रकारची दुकाने असून त्यासमोरील जागेत अनेक फेरीवाल्यांनी आपले ठेले मांडून यात अतिक्रमण केले आहे. त्यामुळे सकाळ आणि संध्याकाळच्या गर्दीच्या वेळेत रेल्वे प्रवाशी तसेच पादचाऱ्यांना चालताना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते.
असाच प्रकार चर्चगेट (Churchgate) रेल्वे स्थानकातील भुयारी मार्गात होत असून या दोन्ही भुयारी मार्गातील स्टॉल्सधारक, अनधिकृत फेरीवाले आदींसह पादचाऱ्यांमुळे केली जाणारी अस्वच्छता दूर करण्यासाठी स्वच्छतेसाठी खासगी संस्थेची नेमणूक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच मेटो सिनेमागृहाशेजारील भुयारी मार्गातही दैनंदिन स्वच्छता राखण्याच्या दृष्टीकोनातून महापालिकच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्यावतीने खासगी संस्थेची नेमणूक करण्यासाठी निविदा निमंत्रित करण्यात आली आहे. या तिन्ही भुयारी मार्गाच्या स्वच्छतेसाठी दररोज प्रत्येकी १६०० रुपये खर्च करण्यात येणार असून वार्षिक सहा लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community