हृदय आणि श्वसनविकाराच्या निदानासाठी तीन प्रमुख रुग्णालयात सी.टी स्कॅन मशीन

179

मुंबई महापालिकेच्या विविध रुग्णालयांसाठी हृदयविकार व श्वसन विकाराचे योग्य निदान करण्यासाठी १२८ स्लाईस सी.टी. स्कॅन मशीनची खरेदी केली जात आहे. महापालिकेच्या तीन प्रमुख रुग्णालयांसाठी प्रत्येकी एक मशीनची खरेदी केली जात असून लवकरच या मशीन्सची सेवा महापालिकेच्या या रुग्णालयांमध्ये दिली जाणार आहे.

( हेही वाचा : मोदी सरकारचा मोठा निर्णय! रुपे डेबिट कार्ड आणि भीम अ‍ॅप व्यवहारांवर इंसेटिव्ह देणार, २६०० कोटींची तरतूद)

मुंबई महापालिकेच्या विविध रुग्णालयांकरता स्लाईन सी.टी स्कॅन मशीन विथ स्टँडर्ड ऍक्सेसरीसह ३ मशीन खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. या मशीनद्वारे जलद आणि सुरक्षितसह अचूक निदान करणे शक्य होते. याद्वारे हृदयविकार व श्वसन विकाराचे योग्य निदान करण्यासाठी त्रिमितीय प्रतिमा दर्शवण्यासाठी याचा वापर रेडीओलॉजी विभागात केला जातो.

या मशीनची खरेदी परळ केईएम रुग्णालय, शीव लोकमान्य टिळक महापालिका रुग्णालय आणि नायर महापालिका रुग्णालय आदी तिन प्रमुख रुग्णालयांसाठी केली जात आहे. या तिन्ही मशीनची खरेदी व तीन वर्षांचा हमी कालावधीनंतर पुढील पाच वर्षांची देखभाल आदींसाठी एकूण ४३ कोटी ८० लाख रुपये एवढे रुपये खर्च केले. यासाठी जपानमधील ईरबिस इंजिनिअरींग कंपनीची निवड करण्यात आली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.