CUET UG 4th Phase 2022: तांत्रिक बिघाडामुळे 13 केंद्रांवरील परीक्षा पुढे ढकलल्या, आता या तारखेला होणार परीक्षा

70

CUET चौथ्या टप्प्याची परीक्षा 17 ऑगस्टपासून सुरु झाली. मात्र चौथ्या टप्प्यात 13 केंद्रांवर 8 हजार 600 विद्यार्थी तांत्रिक बिघाडामुळे परीक्षा देऊ शकले नाहीत. आता त्यांची परीक्षा 30 ऑगस्टला होणार आहे. चौथ्या टप्प्यातील परीक्षा 17 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट 2022 या कालावधीत होणार आहे. 3 लाख 72 हजार उमेदवार या परीक्षेला बसणार आहेत.

कधी होणार परीक्षा?

त्याचबरोबर परीक्षा केंद्रांवर तांत्रिक अडचणींमुळे जे उमेदवार दुस-या टप्प्यातील आणि चौथ्या टप्प्याची परीक्षा देऊ शकले नाहीत. त्यासाठी CUET 6 व्या टप्प्याची परीक्षा 24, 25, 26 आणि 30 ऑगस्ट 2022 रोजी होणार आहे. परीक्षेशी संबंधित अधिक माहितीसाठी, उमेदवार अधिकृत वेबसाईटवर जाहीर केलेले परीक्षेचे वेळापत्रक पाहू शकतात. 6 व्या टप्प्यातील परीक्षेचे प्रवेशपत्र 20 ऑगस्ट 2022 रोजी जारी केले जाईल. प्रवेशपत्र जारी केल्यानंतर, विद्यार्थी अधिकृत वेबसाईट cuet.samarth.ac.in वर जाऊन त्यांचे प्रवेशपत्र डाउनलोड करु शकतात.

( हेही वाचा: आधी राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी; मगच सभापती पदाची लढाई )

तिस-या टप्प्याची परीक्षा 7,8 आणि 10 ऑगस्ट रोजी होणार होती, आता 5 व्या टप्प्याची परीक्षा 21 ऑगस्ट 2022 पासून सुरु होईल आणि 23 ऑगस्ट 2022 पर्यंत चालेल. या परीक्षेला 2 लाखांहून अधिक उमेदवार बसतील. उमेदवारांना परीक्षेशी संबंधित नवीन अपडेटसाठी NTA बेवसाईट WWW.nta.ac.in तपासण्याचा सल्ला दिला जातो.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.