उपराष्ट्रपती जगदीप धनखड (Vice President Jagdeep Dhankhar) यांनी डेहराडूनच्या राष्ट्रीय मिलिटरी कॉलेज (RIMC) च्या कॅडेट्सना संबोधित केले. बल विवेक हे संस्थेचे ब्रीदवाक्य सार्थ ठरवण्याचे आणि जीवनातील मोठ्या संघर्षांना तोंड देण्यासाठी स्वतःमध्ये सामर्थ्य आणि विद्वत्ता यांची जोपासना करण्याचे त्यांनी आवाहन केले. सामर्थ्य आणि विवेकी वृत्ती यांचे एकीकरण अतिशय उत्तम साधन असून ज्यावेळी संकटे येतात तेव्हा या गुणांचे एकीकरण त्यावर मात करण्यासाठी आपल्याला सक्षम करते, असे त्यांनी नमूद केले.
कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रहित सर्वप्रथम ठेवण्याच्या आवश्यकतेवर भर देत उपराष्ट्रपती म्हणाले, “देशाची सेवा अभिमानाने आणि निर्भयपणे करा. भारतमातेचा तुम्हाला आशीर्वाद आहे. देशाचे भवितव्य तुमच्या खांद्यावर आहे. नेहमीच राष्ट्रहिताला प्राधान्य द्या. तुमचे आचरण शिस्त, शिष्टाचार आणि करुणा यांचा दाखला असले पाहिजे, असे ते (Vice President Jagdeep Dhankhar) म्हणाले.
(हेही वाचा 10 सप्टेंबरपर्यंत महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित होणार; Chandrashekhar Bawankule यांची माहिती)
डेहराडूनमधील आरआयएमसी येथील कॅडेट्सना संबोधित करताना, उप-राष्ट्रपतींनी या संस्थेचे माजी विद्यार्थी आणि आरआयएमसी समुदायाला थिंक टँक म्हणून काम करण्याचे आणि तरुणांमध्ये राष्ट्रवादाची भावना रुजवण्याचे आणि देशविरोधी हानिकारक कारस्थानांना निष्प्रभ करण्यासाठी सर्व पावले उचलण्याचे आवाहन केले. अभूतपूर्व आर्थिक वाढ, विकासाचा महान प्रवास आणि जागतिक स्तरावर भारताचा अभूतपूर्व उदय ही वस्तुस्थिती दुर्लक्षित करणारे आणि जागतिक स्तरावर भारताचा अभूतपूर्व उदय, उल्लेखनीय आर्थिक विकास, मोठ्या प्रमाणातील विकासाचा प्रवास याचे महत्त्व नाकारणारे हे घटक आहेत. अपयशाची भीती ही विकासाला सर्वात जास्त मारक असल्याचे धनखड यांनी नमूद केले. आयुष्यात कधीही अपयशाची भीती बाळगू नका, अपयश ही यशाची पहिली पायरी आहे, हे लक्षात ठेवा, असे आवाहन उपराष्ट्रपतींनी (Vice President Jagdeep Dhankhar) केले.
Join Our WhatsApp Community