सांस्कृतिक धोरणात कौशल्य विकासाचा विचार करावा; मंत्री Ashish Shelar यांच्या सूचना

32

मुंबई प्रतिनिधी:

Ashish Shelar : राज्य सांस्कृतिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करताना, त्यातून कौशल्य विकास (Skill development) करणारे अभ्यासक्रम सुरू करून तरुणांना रोजगाराच्या (Employment) नव्या संधी कशा उपलब्ध करता येतील, याचा कृती आराखडा तयार करावा, अशा सूचना सांस्कृतिक कार्य मंत्री ऍड. आशिष शेलार यांनी दिल्या. (Ashish Shelar)

सांस्कृतिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी समिती गठीत
राज्याचे नवे सांस्कृतिक धोरण तयार झाले असून, त्याच्या अंमलबजावणीसाठी माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे (Former MP Vinay Sahastrabuddhe) यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. सोमवार या समितीची बैठक मंत्रालयात मंत्री आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

(हेही वाचा – Abu Azmi यांचे संतापजनक विधान; म्हणे, औरंगजेब हा उत्तम प्रशासक)

नव्या धोरणाची प्रभावी अंमलबजावणीवर भर
मागील सरकारच्या कार्यकाळात सांस्कृतिक धोरणाच्या निर्मितीत योगदान दिलेले सदस्य आणि नव्या अंमलबजावणी समितीच्या सदस्यांसोबत या बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा झाली. राज्यातील सांस्कृतिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी कशी करता येईल आणि त्यातून तरुणांना रोजगाराच्या संधी कशा मिळतील, यावर चर्चा करून उपाययोजना ठरवण्यात आल्या.

सांस्कृतिक धोरणातून रोजगाराच्या संधी
या नव्या धोरणामुळे राज्यातील तरुणांना विविध कला आणि सांस्कृतिक उपक्रमांद्वारे (Cultural activities) कौशल्य विकसित करण्याची संधी मिळणार आहे. यासोबतच, सांस्कृतिक उद्योगात रोजगार निर्माण करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेतले जाणार असून, कला आणि संस्कृती क्षेत्रातील नवोदितांसाठी हे धोरण लाभदायक ठरणार आहे.

(हेही वाचा – Lawyer Black Coat : काळा कोट न घालता वकिलांना चार महिने करता येणार काम; काय आहे कारण ?)

बैठकीला ‘या’ मान्यवरांची उपस्थिती
या बैठकीस पद्मश्री गिरीश प्रभुणे (Padmashri Girish Prabhune), प्रसिद्ध संगीतकार कौशल इनामदार, अनिता यलमटे, आचार्य शाहीर हेमंतराजे पु. मावळे, सुनील दादोजी भंडगे, लेखक अभिराम भडकमकर, शितूदादा म्हसे, पत्रकार राजेश प्रभु साळगावकर, जगन्नाथ कृष्णा दिलीप, दर्शनिका विभागाचे कार्यकारी संपादक व सचिव डॉ. दिलीप प्र. बलसेकर, सांस्कृतिक संचालक विभीषण चवरे, पुराभिलेख संचालनालय संचालक सुजितकुमार उगले, साहित्य अकादमी सहसंचालक सचिन निंबाळकर, रंगभूमी परिनिरीक्षण सचिव संतोष खामकर आदी मान्यवर उपस्थित होते.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.