राज्यातील खासगी व्यावसायिक शिक्षण संस्थांकडून घेतल्या जाणा-या भरमसाठ फीवर लगाम लागणार आहे. खासगी व्यावसायिक शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण शुल्क नियंत्रण प्राधिकरणाच्या कारभारावर उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा वाॅच राहणार आहे. खासगी संस्थांकडून केले जाणारे प्रवेश आणि घेतली जाणारी भरमसाठ फी यावर या विभागाचे विशेष लक्ष असणार आहे.
राज्यातील विनाअनुदानित खासगी व्यावसायिक शिक्षण संस्थांमधील मनमानी कारभाराला लगाम लावण्यासाठी राज्य सरकारने शिक्षण शुल्क नियंत्रण प्राधिकरण स्थापन केले आहे. मात्र पुढील काळात या एफआरएकडून पारदर्शी कारभार होतो की नाही, त्याच्या पडताळणीसाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडूनदेखील यावर लक्ष ठेवले जाणार आहे. FRA कडून शुल्क ठरवण्यात आलेल्या राज्यातील शिक्षण संस्थांपैकी कोणत्याही 10 संस्थांचे ऑडिट उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून करण्यात येणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
( हेही वाचा: चार न्यायमूर्तींच्या खंडपीठाने अवैध ठरवलेल्या ‘वक्फ’ला नेहरूंनी दिली नवसंजीवनी )
या विद्यापीठात मिळणार शुल्क परतावा
अभिमत विद्यापीठातील प्रवेश प्रक्रिया आरक्षणानुसार होत नसल्याने आतापर्यंत येथील विविध आरक्षणाअंतर्गत येणा-या विद्यार्थ्यांना ही सवलत मिळत नव्हती. मात्र, उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून लवकरच याबाबतीदेखील महत्त्वाचा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली.
Join Our WhatsApp Community