भारतात स्मार्टफोन (Smartphone) वापरणाऱ्या नागरिकांची संख्या जास्त आहे. परिणामी डिजिटल अर्थव्यवस्थेला (Digital economy) मोठ्या प्रमणात चालना मिळत आहे. दरम्यान, भारतीयांच्या मोबाइलवर सध्या जगात सर्वाधिक हल्ले होत असून, याद्वारे खासगी माहिती चोरण्यासह आर्थिक गंडाही घातला जात आहे. अशी माहिती ‘जेडस्केलर थ्रेटलॅब्ज २०२४ मोबाइल, आयओटी अँड ओटी थ्रेट’ (ZScaler Threat Labs 2024 Report) अहवालात समोर आला आहे. यामध्ये बँकांवर झालेले मालवेअर अटॅक (Malware attack) हे गेल्या वर्षी २९ टक्क्यांनी वाढले. तर मोबाइलवर स्पायवेअर अटॅक (Mobile spyware attack) तब्बल १११ टक्क्यांनी वाढले आहेत. (Mobile Cyber Attack)
(हेही वाचा – शपथविधी सोहळ्यापूर्वी Devendra Fadnavis यांनी महाकाल मंदिराकडून मागवला भस्म-प्रसाद; पुजाऱ्यांनाही निमंत्रण)
मोबाईल वापरणाऱ्यांना फसवून त्यांच्याकडून त्यांच्या बँक खात्याची माहिती जमवली जाते. नंतर रक्कम पळविण्याचा प्रयत्न केला जातो. अनेकदा बँकावरही असे हल्ले झाले आहेत. या अगोदर सायबर हल्ल्यात भारत तिसऱ्या क्रमांकावर होता मात्र. आता तो अमेरिका आणि कॅनडाला मागे टाकून पहिल्या क्रमांकावर आला आहे. तसेच या अहवालात असे नमूद करण्यात आले आहे की, भारत हे मोबाइल मालवेअर हल्ल्यांचे सर्वात मोठे लक्ष्य बनले आहे. जून २०२३ ते मे २०२४ दरम्यान जगभरातील सर्व मोबाइल मालवेअर हल्ल्यांपैकी सर्वाधिक २८ टक्के भारतात झाले. यानंतर अमेरिकेत २७.३ टक्के आणि कॅनडात १५.९ टक्के हल्ले झाले. भारतातील बँका (Bank), माहिती तंत्रज्ञान कंपन्या आणि सरकारने सायबर हल्ले होऊ नये त्यासाठीची यंत्रणा अधिक बळकट करण्याची गरज वाढली आहे. विशेषतः मोबाईल वापरणाऱ्या नागरिकांनी आणि बँकांनी अधिक सावध राहून व्यवहार करण्याची गरज आहे.
(हेही वाचा – मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पद आमच्यासाठी तांत्रिक व्यवस्था; Devendra Fadnavis यांनी मांडली भूमिका)