Cyber Crime : सावधान! ग्राहकांचे Fingerprints वापरून फसवणूक; बॅंक अकाऊंट होऊ शकते रिकामे

157

अलिकडे सायबर गुन्ह्यांमध्ये लक्षणीय वाढ झालेली आहे. आधार कार्ड क्रमांक आणि फिंगर प्रिंटचा वापर करून सामान्या नागरिकांना लुबाडण्याचा प्रकार सध्या सुरू आहे. सायबर गुन्हेगार ग्राहकांच्या फिंगर प्रिंटचा वापर करून बॅंक अकाऊंटमधील पैसे संबंधित ग्राहताच्या परवानगीशिवाय ( Authentication) काढून घेत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

( हेही वाचा : MNS News : अनंत चतुर्दशीनंतर समुद्र किनारे स्वच्छ करण्यासाठी अमित ठाकरेंची विशेष मोहीम!)

फिंगर प्रिंट क्लोन करून फसवणूक 

ग्राहकांचे फिंगर प्रिंट क्लोन करून फसवणूक होत असल्याचे प्रकार सध्या समोर येत आहेत. बॅंक अकाऊंटचा वापर करताना आपण आपला पिन, पासवर्ड वारंवार बदलू शकतो परंतु फिंगर प्रिंट ही अशी गोष्ट असते की आपण केव्हाच बदलू शकत नाही. आता या फिंगर प्रिंटचा वापर सायबर गुन्हेगार लोकांना फसवण्यासाठी करत आहेत. याबाबत तुमचा फिंगर प्रिंट आणि आधार कार्ड क्रमांक अज्ञात ठिकाणी, ऑनलाईन वेबसाईटला देणे टाळा असे आवाहन तज्ज्ञांकडून केले जात आहे.

प्रत्येकाने खबरदारी घेणे आवश्यक

फिंगर प्रिटंचा वापर करून फसवणुकीचे प्रकार रांचीमध्ये मोठ्या प्रमाणात घडत आहेत. अनेक लोकांच्या बॅंक अकाऊंटमधून अचानक पैसे गायब झाल्याचे उघड झाले आहे. याबाबत रांचीचे एसएसपी किशोर कौशल म्हणाले की, सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून लवकरच अशा प्रकरणांचा शोध घेतला जाईल. सायबर गुन्हेगारांचे डावपेच टाळण्यासाठी प्रत्येकाने खबरदारी घेतली हवी अन्यथा कोणीही या गुन्ह्यांचे शिकार बनू शकतात.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.