Cyber ​​Fraud: आता ‘या’ सरकारी app वर करा मोबाइलच्या माध्यमातून तक्रार

49
लोकांची ऑनलाईन फसवणूक (Online fraud) करुन पैसे कमवणाऱ्या विविध टोळ्या भारतभर सक्रिय आहेत. त्यांच्यामार्फत देशभरातील लोकांना बनावट कॉल करुन, मेसेज करुन त्यांची फसवणूक केली जाते. काहीवेळा बनावट ऑनलाइन शॉपिंग साईट्स (Fake online shopping sites) बनवून लोकांचे पैसे लुटले जातात. ऑनलाईन फसवणुकीचे (Online Fraud) नवनवीन प्रकार या टोळ्या आत्मसात करत असतात. आता याच घटनांची तक्रार ऑनलाइन पद्धतीने सहज करता येणार आहे. यासाठी सरकारने एक अॅप लाँच केले असून, मोबाइल द्वारे ही तक्रार करता येणार आहे. (Cyber ​​Fraud)
   
संचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया (Jyotiraditya Scindia) यांनी शुक्रवारी संचार साथी ॲप (Sanchar Saathi App) लाँच केले. आधी तक्रार करण्यासाठी यूजर्सना वेबसाइटवर जावे लागत असे, परंतु आता हे काम मोबाइलच्या आधारे सहजपणे करता येणार आहे. ऑनलाइन आर्थिक फसवणूक (Online financial fraud) झाल्यास या अॅपवर तक्रार करता येते. हे अॅप हरवलेल्या, चोरी झालेल्या मोबाइल फोनचा मागोवा घेण्यास, अनधिकृत कनेक्शन ओळखण्यास, फसव्या कॉल्स व संदेशांची तक्रार करण्यास मदत करते.
हरवलेला फोन ट्रॅक करता येतो. यासाठी मोबाइल नंबर, मॉडेल, आयएमइआय नंबर, एफआयआरची क्रमांक यासह तुमची माहिती द्यावी लागते. या ॲपच्या मदतीने कोणताही ग्राहक मोबाईल फोनच्या माध्यमातून सायबर फसवणुकीपर्यंत मोबाईल चोरीची तक्रार करू शकणार आहे. त्याला फक्त संचार साथी ॲप डाउनलोड करायचे आहे. संचार साथी हे ॲप गुगल प्ले आणि ॲपल ॲप स्टोअर या दोन्हींवरून डाउनलोड केले जाऊ शकते.

(हेही वाचा – Bangladeshi Infiltrators : आता ग्रामीण भागातही बांगलादेशी नागरिकांची घुसखोरी; सहा बांगलादेशी महिलांना पोलिसांनी घेतलं ताब्यात)

या ॲपच्या मदतीने ग्राहकाला त्याच्या नावाने जारी केलेल्या मोबाईल कनेक्शनची माहितीही मिळू शकणार आहे. अनेक वेळा ग्राहकांना त्यांच्या नावावर किती मोबाईल फोन कनेक्शन सुरू आहेत हे माहीत नसते. या सुविधेमुळे अनधिकृत मोबाईल कनेक्शनला आळा बसेल. ॲपच्या मदतीने मोबाईल हँडसेटची सत्यता सहज तपासता येते. तुम्ही ॲप वापरून संशयास्पद कॉल आणि एसएमएसची तक्रार देखील करू शकता.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.