2022 -23 पासून पदवीपूर्व अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षा विषय शिकवला जाणार आहे. विद्यापीठे आणि उच्च शैक्षणिक संस्थामध्ये विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेची जाणीव करुन देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. सध्या तंत्रज्ञानाचे जाळे झपाट्याने पसरत आहे. त्यामुळे खूप गुंतागुंतीचे प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे माहिती तंत्रज्ञानातील क्रांती आणि सुरक्षेची संबंधित बाबींची वाढती मागणी पाहता सायबर सुरक्षेची गरज भासू लागली आहे. ही काळाची गरज आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेचा अभ्यास क्रम शिकवला जाणार आहे.
( हेही वाचा: हे स्वत:ला समजतात ‘अत्रे’, ‘बाळासाहेब’! )
पदवीपूर्व आणि पदव्युत्तर पदवी स्तरावरील अभ्यासक्रमात सायबर क्षेत्र, सायबर गुन्हे, सायबर गुन्ह्यांचा महिला आणि मुलांना असलेला धोका, सायबर गुन्ह्यांचे स्वरूप, समाज माध्यमांवरील गोपनीयता, इंटरनेट बँकिंग, डिजिटल पेमेंट, मोबाइल पेमेंट, आधार, डेबिट किंवा क्रेडिट कार्ड पेमेंट सुरक्षा, मोबाइल फोन सुरक्षा, उपकरणे सुरक्षा, वाय-फाय सुरक्षा, अँटी व्हायरस, सायबर हल्ला, सायबर दहशतवाद, सायबर युद्ध, ऑनलाइन जॉब फ्रॉड, ब्लॉकचेन, सायबर गुन्हे आणि शिक्षा, सायबर सुरक्षा लेखापरीक्षण आदी पैलूंचे धडे दिले जाणार आहेत.