तेजनंतर आता हामून चक्रीवादळाचा इशारा देण्यात आला आहे. सध्या अरबी समुद्रात जोरदार वादळ सुरू आहे, तर बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या हामून चक्रीवादळाची तीव्रता वाढली आहे. या वादळाचा प्रभाव भारतावर दिसणार नाही, तर अरब देशांमध्ये दिसून येणार आहे.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळाची तीव्रता वाढली आहे. मणिपूर, मिझोराम, आसाम, त्रिपुरा, मेघालय, ओडिशा आणि पश्चिम बंगाल या राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आसामचा दक्षिण भाग, मेघायलयचा पूर्व भाग तसेच ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनारी भागाला याचा सर्वाधिक फटका बसणार असल्यामुळे वादळी वारे किंवा मुसळधार पाऊस पडू शकतो, असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
(हेही वाचा – CJI Dhananjay Chandrachud : न्यायव्यवस्था असूनही भेदभाव, पूर्वग्रह आणि असमानता; सरन्यायाधिशांनी व्यक्त केली चिंता )
वादळी वारे आणि मुसळधार पावसाचा इशारा
बंगालची खाडी आणि ईशान्य भारतात हामून चक्रीवादळामुळे वादळी वारे वाहतील. ओडिशाच्या किनारी भागात सुमारे ४० ते ५० किलोमीटर प्रतितास या वेगाने वारे वाहतील, तर याचा वेग हळूहळू वाढून ७० ते ७५ किलोमीटर प्रतितास एवढा होण्याची शक्यता आहे. बांगलादेशच्या किनारी भागालाही याचा मोठा फटका बसणार असल्याची शक्यता हवामान विभागाने दिली आहे.
SCS Hamoon intensified into VSCS about 290 km east of Paradip (Odisha), 270 km southeast of Digha (West Bengal), 230 km south-southwest of Khepupara (Bangladesh). Likely to weaken and cross Bangladesh’s coast between Khepupara and Chittagong around the evening of 25th Oct as CS. pic.twitter.com/6moaRNxqwZ
— India Meteorological Department (@Indiametdept) October 24, 2023
मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा
हवामान विभागाने मंगळवार, (२४ ऑक्टोबर) आणि बुधवार, (२५ ऑक्टोबर) मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये, असा इशाराही दिला आहे. २५ तारखेच्या सायंकाळपर्यंत या चक्रीवादळाचा जोर कमी होईल आणि ते संपून जाईल. पुढिल इशारा मिळेपर्यंत ही सूचना लागू राहिल, असा अंदाज आयएमडीने व्यक्त केला आहे.