बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र शनिवारी (२ डिसेंबर) खोल दाबात परिवर्तीत झाले. त्यामुळे येत्या १२ तासात त्याचे चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) आंध्र प्रदेश आणि लगतच्या तमिळनाडू किनारपट्टीसाठी मिचॉन्ग चक्रीवादळाचा (Cyclone Michaung) इशारा दिला होता.
आंध्र प्रदेशात धडकणार चक्रीवादळ
“मिचॉन्ग चक्रीवादळ (Cyclone Michaung) गेल्या सहा तासांमध्ये सात किमी प्रतितास वेगाने उत्तर-वायव्य दिशेने सरकलं आहे. मध्यरात्री २:३० वाजता चक्रीवादळ नेल्लोरच्या उत्तर-ईशान्येस सुमारे २० किमी, चेन्नईच्या उत्तरेस १७० किमी, बापटलापासून १५० किमी दक्षिणेस आणि मछलीपट्टणमच्या २१० किमी दक्षिण-नैऋत्येस पोहोचलं. चक्रीवादळाचं तीव्र चक्रीवादळात रुपांतर झालं असून ते वेगाने उत्तरेकडे किनार्याजवळ सरकत आहे. आज दुपारपर्यंत चक्रीवादळ दक्षिण आंध्र प्रदेश किनार्यावर धडकण्याची शक्यता आहे. चक्रीवादळाचा लँडफॉलचा धोका पाहता या भागात अलर्ट जारी करण्यात आला आहे.
A well managed chennai.. by the anti sanathani team #ChennaiFloods pic.twitter.com/pixM9yUXQq
— unni (@unnisv) December 4, 2023
(हेही वाचा – आता ISRO उलघडणार ब्लॅक होल्सचे रहस्य)
चेन्नईमध्ये अतिमुसळधार पाऊस
चक्रीवादळ मिचॉन्गमुळे (Cyclone Michaung) हवामान विभागाने (IMD) हलक्या गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अलर्ट जारी केला आहे. चेन्नई, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश तसेच दक्षिण किनारपट्टी भागात रविवारपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. चेन्नई, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशमध्ये शाळा आणि महाविद्यालयांनाही सुट्टी देण्यात आली आहे. गेल्या २४ तासांच चेन्नईमध्ये अतिमुसळधार पाऊस झाला आहे.
चेन्नईमध्ये पाच जणांचा मृत्यू, विमानसेवा बंद
चेन्नईत चक्रीवादळामुळे (Cyclone Michaung) विजेचा धक्का लागून आणि झाडं कोसळणे यासारख्या दुर्घटनांमुळे सोमवारी (४ डिसेंबर) पाच जणांचा मृत्यू झाला आहे. मुसळधार पाऊस आणि पाणी साचल्याने निर्माण झालेल्या भीषण पूरसदृश परिस्थितीमुळे सोमवारी शहर आणि परिसरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं. चेन्नई विमानतळावरही पूरस्थिती निर्माण झाली होती. रनवे पाण्याखाली गेल्याने विमाने उड्डाणे रद्द करण्यात आली होती, तर काही विमाने दुसऱ्या मार्गाने वळवण्यात आली. मंगळवारी सकाळी ९ वाजेपर्यंत विमानसेवा बंद ठेवण्यात आली आहे. (Cyclone Michaung)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community