भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) शुक्रवारी सांगितले की, अरबी समुद्राचे आग्नेय आणि लगतचे नैऋत्य क्षेत्र कमी दाबाचे क्षेत्र बनले आहे, त्यामुळे शनिवार २१ ऑक्टोबर रोजी चक्रीवादळ (Cyclone Tej) होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अरबी समुद्रातील हे या वर्षातील दुसरे चक्रीवादळ असेल. या चक्रीवादळाला ‘तेज “असे नाव देण्यात आले आहे.
हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, हे चक्रीवादळ (Cyclone Tej) रविवारी २२ ऑक्टोबर रोजी तीव्र चक्रीवादळात बदलू शकते आणि दक्षिणेकडील ओमान आणि येमेनच्या किनाऱ्यावर धडकू शकते. तथापि, हवामान विभागाने अशी भीती व्यक्त केली आहे की हे वादळ देखील मागील चक्रीवादळ बिपरजॉयप्रमाणे आपला मार्ग बदलू शकते. हे वादळ अरबी समुद्रात वायव्येकडे वळणार होते, परंतु त्याने आपली दिशा बदलली आणि गुजरातमधील मांडवी आणि पाकिस्तानातील कराचीच्या किनाऱ्यावर धडकले आहे. आतापर्यंत, हे चक्रीवादळ येमेन-ओमानच्या किनाऱ्यावर धडकेल अशी चिन्हे दिसत आहेत. (Cyclone Tej)
(हेही वाचा – World Health Organization : महिलांमध्ये लोहाच्या कमतरतेचे प्रमाण जास्त; जागतिक आरोग्य संघटनेचा दावा)
तथापि, जागतिक हवामानाच्या अंदाजानुसार हे तेज चक्रीवादळ (Cyclone Tej) अरबी समुद्रात निर्माण झाले असून त्याने त्याचा मार्ग बदलून ते पाकिस्तान आणि गुजरातच्या किनाऱ्याकडे जाण्याची शक्यता वर्तवली आहे. यादरम्यान ६२ – ८८ किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community