धारावीत सिलेंडरचा स्फोट… 15 जण जखमी

धारावीत रविवारी दुपारी गॅस सिलेंडर स्फोट होऊन दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत एकूण 15 जण होरपळले असून, 10 जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. उर्वरित 8 जणांची प्रकृती गंभीर असल्याचे समजत आहे.

कशी झाली दुर्घटना?

धारावीच्या शाहू नगर येथील कमला नगर येथे दुपारी 12.28च्या सुमारास या गॅस सिलेंडरचा स्फोट झाला आहे. एका घराबाहेर ठेवलेल्या गॅस सिलेंडरची टाकीत गळती होऊन हा स्फोट झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात येत आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाची दोन फायर इंजिन घटनास्थळी दाखल झाली. अग्निशमन दलाला ही आग विझवण्यात यश आले आहे. या दुर्घटनेत 15 जण होरपळले असल्याची माहिती मिळत आहे. या सर्व जखमींना उपचारासाठी तातडीने सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

(हेही वाचाः दहीहंडी, गणेशोत्सव सुपर स्प्रेडर बनतील! असे का म्हणाले केंद्र सरकार?)

5 जणांची प्रकृती गंभीर

15 जखमींपैकी 10 जखमींची प्रकृती स्थिर आहे. यात चार आणि पाच वर्षांच्या दोन चिमुकल्यांचा समावेश आहे. उर्वरित 5 जण हे गंभीर जखमी झाले असून, त्यापैकी दोन जण 50 ते 60 टक्के भाजल्याचे समजत आहे. तर इतर तीन जणांचे चेहरे भाजले असून त्यांचीही प्रकृती गंभीर आहे. यामध्ये 8 वर्षांच्या चिमुकल्याचाही समावेश आहे, असी माहिती प्रशासनाकडून देण्यात आले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here