सिलिंडर डिलिव्हरी दरम्यान अतिरिक्त पैसे आकारले जाताहेत? ‘या’ क्रमांकावर करा तक्रार

171

पेट्रोल-डिझेलप्रमाणे गॅस सिलिंडरच्या दरांमध्ये सुद्धा दिवसेंदिवस वाढ होत आहे. सिलिंडर महाग झालेले असतानाच सर्वसामान्यांच्या गरजेचा फायदा सिलिंडर डिलिव्हरी करणारे काही जण घेत असतात. सिलिंडर डिलिव्हरी करणारे काही डिलिव्हरी मॅन ग्राहकांकडून अतिरिक्त २५ ते ३० रुपये आकारतात. असा अनेक लोकांचा अनुभव आहे. याप्रकारे अतिरिक्त पैशांची मागणी करणे हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे.

( हेही वाचा : SSC अंतर्गत ४५०० पदांसाठी भरती! मिळेल ६० हजारांहून अधिक पगार, येथे करा अर्ज  )

टोल फ्री क्रमांकावर करा तक्रार…

मुंबईमध्ये भारत गॅस, इंडेन आणि हिंदुस्तान पेट्रोलियम म्हणजेच एचपी या कंपन्यांद्वारे गॅस सेवा पुरवली जाते. हे सिलिंडर घरोघरी पोहोचवणाऱ्या कर्मचाऱ्यांना मासिक पगार मिळतो. तरीही अनेक कर्मचारी आपल्या ग्राहकांकडे अतिरिक्त पैशांची मागणी करतात. या प्रकारची मागणी कुणी केल्यास ग्राहकांना टोल फ्री क्रमांकावर तक्रार करता येते.

काय आहेत टोल फ्री क्रमांक?

  • भारत गॅस – १८००२२४३४४
  • इंडेन गॅस – १८००२३३३५५५
  • हिंदुस्तान पेट्रोलियम (एचपी) – १८००२३३३५५५

ग्राहकांकडून संबंधित कर्मचाऱ्यांनी अतिरिक्त पैशांची मागणी केल्यास ग्राहक या टोल फ्री क्रमांकावर कॉल करून तक्रार करू शकता. गॅस कंपन्या या प्रकरणांची चौकशी करून ते अतिरिक्त पैसे ग्राहकांना परत मिळतील याची काळजी घेतील. तसेच दोषी आढळल्यास योग्य कारवाई करण्यात येईल असे गॅस कंपन्यांनी स्पष्ट केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.