सुप्रीम कोर्टातील न्यायदेवतेच्या मूर्तीच्या डोळ्यावरील काळी पट्टी हटवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी घेतला आहे. तसेच न्यायदेवतेच्या हातात तलवारीच्या जागी संविधान या नव्या मूर्तीत पाहायला मिळणार आहे. जुनी मूर्ती ब्रिटीश परंपरेतील असल्याने त्या मूर्तीला बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, ग्रीक संस्कृतीमधील थेमिस देवतेच्या आधारावर ही मूर्ती तयार करण्यात आली होती. ही मूर्ती सगळीकडे न्यायदेवतेचे प्रतिक मानली जायची. मात्र सरन्यायाधीशांनी घेतलेल्या निर्णयानंतर भारतीय न्यायदेवतेचे प्रतिक असे या मूर्तीबाबत बोलले जात आहे. (CJI D Y Chandrachud)
( हेही वाचा : बेस्टमध्ये खासगी बसेसची सेवा घेण्याचा आमचा प्रयत्न फसला; UBT Shiv Sena च्या सुहास सामंतांनी केले मान्य)
सर्वोच्च न्यायलयाचे वकील सिध्दार्थ शिंदे यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, जजेस लायब्ररीमध्ये ही नवी मूर्ती लावण्यात आलेली आहे. मात्र ही मूर्ती सर्वच न्यायालयात वापरली जाईल, याबाबत कोणतीच माहिती नाही. ग्रीक देवतेच्या आधारावर जुनी मूर्ती होती. परंतु डोळ्यावरील पट्टी काढलेली नवी मूर्तीची आज खरी गरज आहे. कारण डोळ्यावरील पट्टी काढण्याची आजच्या काळात फार गरज होती. या मूर्तीसाठी कोणालाही काहीही हरकत नसावी. हा संपूर्ण निर्णय सरन्यायाधीशांचा आहे. त्यात तलवारीच्या जागी संविधान असल्याने काहीही गैर नाही. (CJI D Y Chandrachud)
तर एका वृत्तसंस्थेला माहिती देताना ज्येष्ठ वकील उज्जव निकम म्हणाले की, अनेक खटल्यांमध्ये काम करत असताना मी सांगतो की, न्यायदेवतेने डोळस असले पाहिजे. डोळस यांचा अर्थ पुराव्याचा कायद्यानुसार छाननी करणे. तसेच संविधानावर आधारित राहून न्याय देणे, हे न्यायदेवतेचे प्रमुख कर्तव्य आहे. त्यामुळे सरन्यायाधीशांनी बदलेली पारंपारिक काळापासून असलेली न्यायदेवतेची मूर्तीचा उद्देश होता की, डोळ्यासमोर कुणीही पक्षकार आला तर त्याचा विचार न करता, निकाल देणे. मात्र न्यायदेवतेने पक्षकारांचा विचार करून निकाल न देणे ही भूमिका योग्य असली तरी न्यायदेवतेने डोळस असले पाहिजे. जेणेकरून खर कोण, खोट कोण? याची खात्री होते. त्यामुळे या बदलाचे आपण स्वागत करायला हवे, असे ही निकम म्हणाले. या प्रकरणात डोळ्यांवरून पट्टी हटवलेली मूर्ती सुप्रीम कोर्टात कधी येणार? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. (CJI D Y Chandrachud)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community