फरारी ड्रग्ज माफिया ललित पाटील याला ससूनमध्ये दाखल करण्यासाठी राज्याचे मंत्री दादा भुसे यांचा फोन गेला होता. (Dada Bhuse) त्यांचे कॉल रेकॉर्ड चेक करा, असा आरोप ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला. त्यांच्या या आरोपावर दादा भुसे यांनी त्यांच्यावर मानहानीचा दावा दाखल करण्याची चेतावणी दिली आहे. ड्रग्जमाफिया ललित पाटील प्रकरणी सुषमा अंधारे यांनी ऐकीव माहितीच्या आधारे आरोप केले आहेत, त्यामध्ये तथ्य नाही, असे मंत्री दादा भुसे म्हणाले. चौकशीतून सत्य बाहेर येईल, आरोप सिद्ध न झाल्यास अंधारे यांच्यावर मानहानीचा दावा करणार असल्याचेही दादा भुसे म्हणाले आहेत. (Dada Bhuse)
(हेही वाचा – BJP vs Congress : भाजप-काँग्रेसमध्ये तीन राज्यांत अटीतटीची लढत)
फरारी ड्रग्ज माफिया ललित पाटील याला ससूनमध्ये दाखल करण्यासाठी राज्याचे मंत्री दादा भुसे यांचा फोन गेला होता, त्यांचे कॉल रेकॉर्ड चेक करा, असा थेट आरोप ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला. त्या आधी पुण्यातील आमदार रविंद्र धंगेकरांनीही ललित पाटील पळून जाण्यामागे राज्यातील मंत्र्यांचा हात असल्याचा आरोप केला होता. ललित पाटील हा काही दिवसांपूर्वी ससूनमधून फरारी झाला होता. त्यावरून आता आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. (Dada Bhuse)
ललित पाटील पळून जाण्यात शिंदे गटातील एका मंत्र्याचा हात असल्याचा आरोप कॉंग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला होता. ललित पाटीलवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे. (Dada Bhuse)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community