माहिम, दादरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी रुग्णांची शंभरी!

जी-उत्तर विभागातील धारावी, दादर व माहिमध्ये शुक्रवारी एकूण २९३ रुग्ण आढळून आले. यामध्ये धारावीमध्ये ७३ रुग्ण आढळून आले आहेत. तर दादर व माहिममध्ये अनुक्रमे १०० व १२० रुग्ण आढळले.

दादर आणि माहिममध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा जोर वाढू लागला असून सलग दुसऱ्या दिवशी या दोन्ही भागांमध्ये रुग्णांनी शंभरी गाठली. त्यामुळे वाढत्या रुग्णसंख्येमुळे धारावीमध्ये लक्षणे नसलेल्या रुग्णांसाठी सीसीसी टूसाठी एसआरएची इमारत ताब्यात घेण्यात आली असून यापूर्वीची दोन रुग्णालयेही पुन्हा सुरु करण्यात आली. याशिवाय दादरमध्ये वनमाळी हॉल आण वनिता समाजमध्ये अतिरिक्त व्यवस्था करण्यात आली आली.

एकूण २९३ रुग्ण आढळून आले!

जी-उत्तर विभागातील धारावी, दादर व माहिमध्ये शुक्रवारी एकूण २९३ रुग्ण आढळून आले. यामध्ये धारावीमध्ये ७३ रुग्ण आढळून आले आहेत. तर दादर व माहिममध्ये अनुक्रमे १०० व १२० रुग्ण आढळले. त्यामुळे या जी उत्तर विभागात एकूण २,८९७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. या विभागात सुमारे ३०० रुगांवर संख्या आल्याने आता लक्षणे नसलेल्या आणि लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी कोविड काळजी केंद्र तसेच रुग्णालयांची संख्या पुन्हा वाढवली जात आहे.

(हेही वाचा : बापरे! कोरोना रुग्ण वाढले, खाटा भरल्या! )

धारावीमध्ये एसआरएच्या सात मजली इमारती ताब्यात!

सध्या संपूर्ण जी उत्तर विभागासाठी दादरमधील वनिता समाजमध्ये एकमेव कोविड काळजी केंद्र आहे. यामध्ये ३०० रुग्णांची क्षमता असली तरी अतिरिक्त खाटांची व्यवस्था याठिकाणी करण्यात येत आहे. याशिवाय वनमाळी हॉलमध्येही खाटांची व्यवस्था करण्यात येत आहे. याबरोबरच धारावीमध्ये एसआरएच्या ताब्यातील सात मजली इमारतही महापालिकेने दोनच दिवसांपूर्वी ताब्यात घेतली आहे. या इमारतीच्या प्रत्येक मजल्यावर २३ खोल्या असून प्रत्येक खोलीत दोन ते तीन खाटांची व्यवस्था केली जावू शकते. त्यामुळे प्रत्येक मजल्यावर ७५ रुग्णांची व्यवस्था केली जाणार असून आवश्यकतेनुसार प्रत्येक मजल्यावरील व्यवस्था वाढवण्यात येईल, असे जी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांनी स्पष्ट केले. याबरोबरच साई हॉस्पिटल व प्रभात नर्सिंग होम हे यापूर्वी महापालिकेच्या ताब्यात होते. पण ऑक्टोबर महिन्यात ते परत करण्यात आले होते. परंतु पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागल्याने ही दोन्ही रुग्णालये पुन्हा महापालिकेच्या ताब्यात घेवून तिथे  रुग्णांना सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

लसीकरणातही माहिम, धारावीत वाढ!

मागील २२ मार्चपासून धारावीत लसीकरणाला सुरुवात झाली असून ३१ मार्चपर्यंत २३९ एवढे दैनंदिन लसीकरण होत असतानाच मागील दोन दिवसांमध्ये  लसीकरणाची त्रिशतक पार केले आहे. गुरुवारी १ एप्रिल रोजी धारावीत ३६० जणांनी लस घेतली होती, तर शुक्रवारी ३९१ जणांनी लस घेतली आहे. धारावीमध्ये लसीकरणासाठी स्थानिक खासगी डॉक्टरांची मदत घेवून त्यांच्यामार्फत लोकांमध्ये जनजागृती केली जात आहे. त्यामुळेच धारावीत आजवरच्या तुलनेत सर्वाधिक लसीकण झाल्याचे जी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांनी स्पष्ट केले. तर माहिममध्येही गुरुवारी व शुक्रवारी अनुक्रमे ६१३ व ६०९ अशाप्रकारे लसीकरण झाले आहे. ३१ मार्चपर्यंत दैनंदिन पावणे चारशेपर्यंत लसीकरण होत होते. परंतु मागील दोन दिवसांमध्येही माहिमकरांनी लसीकरणात मोठ्याप्रमाणात भाग घेतला आहे.

मुंबईत दिवसभरात ८८३२ रुग्ण, २० जणांचा मृत्यू

मागील आठ दिवसांमध्ये मुंबईतील रुग्णसंख्या अधिकच वाढलेली पाहायला मिळत आहे. गुरुवारी ८,६४६ रुग्ण आढळून आल्यानंतर शुक्रवारी ८,८३२ रुग्ण आढळून आले. सलग दुसऱ्या दिवसात साडेआठ हजारांवर रुग्ण संख्या वाढल्याने ही वाढती रुग्ण संख्या चिंता व्यक्त करणारी आहे. पण मृत्यूचा आकडाही वाढत जात आहे. शुक्रवारी २० जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईमध्ये शुक्रवारी ८,८३२ रुग्ण आढळून आले आहे. तर दिवसभरात ५,३५२ रुग्ण बरे होवून घरी परतले. तर गुरुवारपर्यंत सक्रीय रुग्णांची संख्या ५५ हजार००५ वर पोहोचली आहे. दिवसभरात २० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू पावलेल्यांपैंकी १६ रुग्णांना दिर्घकालिन आजार होते. यामध्ये १३ पुरुष व ७ महिलांचा समावेश आहे. मृत्यूचा आकडा आता वीसच्या जवळपास पोहोचू लागला. दिवसभरात ४४ हजार ३२८ जणांच्या चाचण्या करण्यात आल्या असून त्यामध्ये ८८३२ रुग्ण आढळून आले आहेत. गुरुवारपर्यंत ७० झोपडपटी व चाळी या कंटेन्मेंट झोन झाले असून कंटेन्मेंट इमारतींची संख्या ६५७ एवढी आहे. तर रुग्ण दुपटीचा कालावधी शंभरी पार झालेला असतानाच आता तो ४६ दिवसांवर आला आहे. त्यामुळे मुंबईकरांसाठी ही धोक्याची घंटा असल्याचेही बोलले जात आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here