दादर, माहिमने गाठली शंभरी!

माहिममधील आतापर्यंतची रुग्णांची संख्या ६,१८६, तर दादरमधील रुग्णांची संख्या ६ हजार १८४ बनली आहे.

मागील काही महिन्यांपासून महापालिकेच्या जी उत्तर विभागातील धारावी विभाग शांत असला तरी दादर आणि माहिममध्ये कोरोनाचे रुग्ण वाढतच आहेत. गुरुवारी जी उत्तर विभागात २७६ रुग्ण आढळून आले असून यामध्ये दादरमध्ये १०४ आणि माहिममध्ये १०१ रुग्ण आढळले. तर धारावीमध्ये ७१ रुग्ण आढळून आहेत.

माहिममधील आतापर्यंतची रुग्णांची संख्या ६,१८६!

जी उत्तर विभागातील माहिममध्ये मागील १६ मार्चपर्यंत रुग्ण संख्या सरासरी २३ ते २४ अशी होती. तर ही संख्या सातत्याने वाढत जात आता गुरुवारी माहिममध्ये १०१ रुग्ण आढळून आले. तर बुधवारी म्हणजे ३१ मार्च रोजी ९५ रुग्ण आढळले होते. त्यामुळे माहिममधील एकूण रुग्णांची संख्या ६,१८६ एवढी झाली आहे. जी उत्तर विभागात माहिममध्ये सर्वाधिक एकूण रुग्णांची संख्या आहे.

(हेही वाचा : महापालिकेने रचला इतिहास: तीन महिन्यांमध्ये विक्रमी मालमत्ता कराची वसुली)

दादरमधील आतापर्यंतची रुग्णांची संख्या ६ हजार १८४!

तर दादरमध्येही १६ मार्चपर्यंत सरासरी १८ रुग्ण आढळून येत होते. परंतु दादरमध्येही रुग्ण वाढू लागले असून गुरुवारी १ एप्रिल रोजी १०४ रुग्ण आढळून आले आहेत. तर ३१ मार्च रोजी ही रुग्ण संख्या ६० एवढी होती. एकाच दिवसात ४४ रुग्ण वाढून दादरमध्ये रुग्णांनी शंभरी गाठली आहे. त्यामुळे दादरमधील एकूण रुग्णांची संख्या ६ हजार १८४ वर पोहोचली आहे. तर धारावीमध्ये १ एप्रिलमध्ये ७१ रुग्ण आढळून आले असून आतापर्यंत एकूण रुग्णांची संख्या  ४९८५ एवढी झाली आहे. त्यामुळे धारावीपेक्षा आता माहिम व दादरमध्ये कोरोनाच्या आजाराने डोके वर काढले असून या दोन्ही भागांसाठी ही धोक्याची घंटा आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here