Dadar DSilva Road : फेरीवाल्यांनी डिसिल्व्हा रोड अडवला, वरळी, प्रभादेवीकरांनी घरी कसे जायचे?

दादर रेल्वे स्थानकावरून वरळी गावात जाणाऱ्या प्रवाशांसाठी बेस्ट बसेस सोडल्या जात असून दादर ते वरळी गाव असे धावणाऱ्या ए ११८ क्रमांकांची बस मागील बुधवारी फेरीवाल्यांमुळे बंद ठेवण्यात आली होती.

3351
Dadar DSilva Road : फेरीवाल्यांनी डिसिल्व्हा रोड अडवला, वरळी, प्रभादेवीकरांनी घरी कसे जायचे?
Dadar DSilva Road : फेरीवाल्यांनी डिसिल्व्हा रोड अडवला, वरळी, प्रभादेवीकरांनी घरी कसे जायचे?

दादर रेल्वे स्थानकावरून (Dadar Railway Station) वरळी गावात जाणाऱ्या प्रवाशांसाठी बेस्ट बसेस सोडल्या जात असून दादर ते वरळी गाव असे धावणाऱ्या ए ११८ क्रमांकांची बस मागील बुधवारी फेरीवाल्यांमुळे बंद ठेवण्यात आली होती. मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी करण्यात येणाऱ्या पुजेसाठी बुधवारच्या दिवशी दादरचे रोड फळा-फुलांच्या विक्रीसाठी भरुन जातो. त्यामुळे या बुधवारी प्रवाशांच्या मागणीनुसार बेस्टने बसेस सुरु ठेवल्या असल्या तरी या फेरीवाल्यांनी (hawkers) रस्ते अडवून ठेवल्याने बस चालकांचा जीव मेटाकुटीला येत आहे. त्यामुळे या रेल्वे स्थानक ते कबुतरखान्यापर्यंतचा प्रवास करतानाच प्रवाशांना १५ ते २० मिनिटांचा प्रवास करावा लागत आहे. (Dadar DSilva Road)

New Project 2023 12 20T194508.371

वरळी गावातील रहिवाशांना दादर रेल्वे स्थानकावरुन (Dadar Railway Station) प्रवास करता यावा यासाठी रेल्वे स्थानक ते वरळी गाव यासाठी ए ११८ क्रमांकांची बस मागील काही महिन्यांपूर्वी सुरु करण्यात आली. या बसला प्रवाशांची प्रचंड प्रतिसाद लाभत असून या वाढत्या प्रतिसादामुळे या बस फेऱ्यांची संख्याही वाढवली जात आहे. मात्र, दादर पश्चिम येथील डिसिल्व्हा मार्गावरील केशवसुत उड्डाणपुलाजवळ प्रारंभ स्थानक असलेल्या या बसला वळण घेताना तसेच बस उभ्या करताना फेरीवाल्यांचा प्रचंड त्रास करावा लागत आहे. या वाढत्या फेरीवाल्यांमुळे या मार्गावर बस सुरु ठेवणेही उपक्रमाला जिकरीचे होऊ लागले आहे. (Dadar DSilva Road)

New Project 2023 12 20T194635.959

फेरीवाल्यांच्या व्यवसायासाठी लोकांची सेवा बंद

या वाढत्या फेरीवाल्यांमुळे (hawkers) बस सेवा ही अत्यंत जीव मुठीत घेऊन सुरु ठेवली जात असली तरी मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी केल्या जाणाऱ्या पुजेकरता बुधवारी साहित्याची विक्री करण्यासाठी दादरमध्ये प्रचंड फेरीवाल्यांची (hawkers) संख्या वाढू लागली आहे. डिसिल्व्हा रोडच्या पदपथासह रस्त्यावर आणि या रस्त्यांच्या मधोमधही फेरीवाले बसत असल्याने या मार्गावरुन बस सुरु ठेवणे कठीण असल्याने बेस्ट उपक्रमाला मागील बुधवारी बस सेवा पूर्णपणे बंद ठेवावी लागली होती. परंतु लोकांची सेवा बंद ठेवून फेरीवाल्यांच्या व्यवसाय व्हावा यासाठी महापालिकेचे अधिकारी आणि स्थानिक दादर पोलिसांनी प्रयत्न केल्याचे दिसून येते. (Dadar DSilva Road)

(हेही वाचा – Hasan Mushrif : रुग्णालय प्रशासनात सैन्य दलाच्या माजी अधिकाऱ्यांचा समावेश; हसन मुश्रीफ यांचे सूतोवाच)

New Project 2023 12 20T194745.667

पोलिसांचीही गाडीही अडकली गर्दीत

मात्र, या बुधवारी बस सेवा सुरु ठेवली असली तरी डिसिल्व्हा रस्त्याच्या मधोमधच कबुतरखान्यापासून ते केशवसुत उड्डाणपुलापर्यंत फेरीवाल्यांनी ठाण मांडली होती. बसेस कबुतरखान्याकडे अडकून पडल्यानंतरही फेरीवाले बाजुला हटायला तयार नव्हते, ना पोलिसांची गाडी आली तरीही. पोलिसांचीही गाडीही या गर्दीत अडकून पडली होती. त्यामुळे आतमध्ये गेलेल्या बसेस बाहेर यायला आणि बाहेरील बसेस आतमध्ये जायला दोन मिनिटांच्या प्रवासाला दहा ते पंधरा मिनिटे प्रवाशांसह चालकाला ताटकळत बसावे लागत होते. (Dadar DSilva Road)

डिसिल्व्हा मार्गावर बस सेवा सुरु असल्याने तसेच बाजुला वरळी आणि सिध्दिविनायक मंदिराकडे (Siddhivinayak Temple) जाणारी शेअर टॅक्सी सेवा सुरु असल्याने या मार्गावरील सर्व फेरीवाले हटवणे आवश्यक आहे. परंतु याच मार्गावरील पदपथ, रस्ते फेरीवाल्यांनी अडवून ठेवल्यानंतरही यावर महापालिका आणि पोलिसांची कारवाई केली जात नाही. त्यामुळे डिसिल्व्हा मार्गावरील फेरीवाल्यांना संरक्षण देऊन जनतेला बस सेवेपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न प्रशासनाचा आहे का असा सवाल रहिवाशांकडून केला जात आहे. (Dadar DSilva Road)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.