दादरच्या पदपथांची तातडीने डागडुजी : जे पाच वर्षांत जमले नाही ते दहा दिवसात करून दाखवले

102

दादर पश्चिम रेल्वे स्थानकाजवळील प्रत्येक पदपथ फेरीवाल्यांनी अडवून ठेवल्याने त्यावरील निखळलेल्या पेव्हरब्लॉकच्या जागी नव्याने सिमेंट काँक्रीटीकरण करण्याकडे यापूर्वी महापालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले होते. फेरीवाल्यांमुळे या पदपथाचे सिमेंटीकरण केले जात नव्हते की प्रत्यक्षात निखळलेले पेव्हरब्लॉक योग्यरितीने बसवण्याचाही प्रयत्न केला गेला नव्हता. परंतु जी उत्तर विभागाच्या सहायक आयुक्तपदाची जबाबदारी प्रशांत सपकाळे यांनी स्वीकारताच त्यांनी दादर पश्चिम येथील रेल्वे स्थानकाजवळील सर्व रस्त्यांच्या पदपथांवरील निखळलेल्या पेव्हरब्लॉकची डागडुजी करण्यास सुरुवात केली.

( हेही वाचा : ‘गेट वे ऑफ इंडिया’वर कार्यक्रमांसाठी मोजावे लागणार इतके पैसे)

निखळलेल्या पेव्हरब्लॉकच्या डागडुजीचे काम हाती घेतले

दादर पश्चिम येथील रेल्वे स्थानकाकडे येणारे रानडे मार्ग, डिसिल्व्हा रोड, जावळे मार्ग आदी मार्गावरील पदपथांवरील पेव्हरब्लॉक निखळले गेले असून त्यामुळे खरेदीला येणाऱ्या अनेक पादचाऱ्यांना आदळत आपटत चालावे लागते. जावळे मार्गावरील कबुतरखाना समोरील पदपथावर पेव्हरब्लॉक खचून मोठा खड्डा पडला होता, तर पुढील भागांमध्ये पेव्हरब्लॉक पूर्णपणे निखळले तथा उखडले गेले होते. मागील जानेवारी महिन्यामध्ये या सर्व पदपथावरील उखडलेल्या पेव्हरब्लॉक विषयी हिंदुस्थान पोस्टने प्रशासनाच्या निदर्शनास ही बाब आणूनही स्थानिक नगरसेवक आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रकारची कार्यवाही केली नाही.

New Project 2 11

डागडुजी करण्यावर भर

परंतु मागील आठवड्यात पेव्हरब्लॉक खचून पडलेल्या खड्डयांचे वृत्त हिंदुस्थान पोस्टने दिल्यानंतर जावळे मार्गावरील पदपथवर खचलेले पेव्हरब्लॉक तातडीने सुस्थितीत करण्यात आले आहे. ‘दादरकरांचे पाय खड्डयात’ या मथळ्याखाली दिलेल्या वृत्ताची दखल घेत जी-उत्तर विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत सपकाळे यांनी खचलेल्या पदपथाच्या भागाची सुधारणा करतानाच या सर्व पदपथावरील निखळलेल्या पेव्हरब्लॉकच्या डागडुजीचे काम हाती घेतले. शनिवारी महापालिकेच्यावतीने रानडे मार्गावरील नक्षत्र मॉलसमोरील पदपथावरील काहीप्रमाणात निखळलेल्या पेव्हरब्लॅकमुळे लोकांच्या अंगावर होणारा चिखल पाण्याचा अभिषेक होत असल्याने येथील पेव्हरब्लॉक काढून पुन्हा सुस्थितीत करण्यात आले. सपकाळे यांनी पावसाळ्यात पदपथाची नव्याने सुधारणा करता येणार नसल्याने तुर्तास पादचारी लोकांची काळजी घेत उखडलेले पेव्हरब्लॉकची डागडुजी करण्यावर भर दिला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.